Varsha Gaikwad : महाराष्ट्रातील शाळेबाबत, नेमकं काय झालं? खासदार गायकवाड महायुती सरकारवर भडकल्या

Congress MP Varsha Gaikwad reaction to the mahayuti government school decision in Chandrapur : महाराष्ट्रातील शाळा व्यवस्थापनाबाबत महायुती सरकारने केलेल्या निर्णयावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड चांगल्याच संतापल्या आहेत.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्यामुळं राज्यातील महायुती सरकारनं निर्णयाचा सपाटा लावला आहे. चंद्रपूरमधील माउंट कार्मेल काॅन्व्हेंट शाळेबाबत महायुती सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं घेतलेल्या निर्णयावरून वाद उद्भवला आहे. ही शाळा गुजरातच्या अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशनकडे देण्याचा अध्यादेश काढला आहे.

यावर काँग्रेसच्या खासदार तथा माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड चांगल्याच संतापल्या आहेत. 'राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणत, याचं उत्तर द्यावाच लागले', असा इशारा दिला आहे.

राज्यातील महायुती सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं चंद्रपूरमधील माउंट कार्मेल काॅन्व्हेट शाळेचे व्यवस्थापन गुजरात अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशनला देण्याचा अध्यादेश काढला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या शाळेचा हाच पॅटर्न महाराष्ट्रातील इतर शाळांमध्ये सुद्धा राबवला जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसच्या (Congress) खासदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आगपाखड केली आहे.

Varsha Gaikwad
Nilesh Lanke : 'तू खींच फोटो', खासदार लंकेंचा अमित शाहांबरोबरचा फोटो काढण्याचा किस्सा अन्...

वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील महायुती सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील शाळांचे (School) व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? महाराष्ट्रातील सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेले आहे, असंच दिसतंय".

Varsha Gaikwad
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांच्या मतदारसंघात भाजपच्या गुजरात निवडणूक टीमने ठोकला तळ, हे आहे कारण...

गायकवाडांचा घणाघात

यानंतर वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढत, चांगल्याच संतापल्या. "महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला पळवले, संस्था तिकडं वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलं गेलं, मुंबईतील एअर पोर्ट, वसाहती, धारवी, मुलुंड, देवनार, मिठागराच्या जागा, एमएसआरडीसी वांद्रे रेक्लेमेश इथल्या जागा आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा पाप या सरकारनं केले, आता शाळा ही देत आहेत", असा घणाघात वर्षा गायकवाड यांनी केला.

झोंबणारे 'हॅशटॅग'

आता शाळांचा निर्णय झाला. पुढे महापालिका, ग्रामपंचायतही गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील, हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार महाराष्ट्र गिळू पाहत आहे, यांना हटवा, असे म्हणत चंद्रपूरमधील शाळा चालवण्यासाठी महाराष्ट्रातील एकही संस्था नव्हती का? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे. महायुती सरकारवर संतापाची पोस्ट 'एक्स'वर शेअर करताना 'महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव', असे 'हॅशटॅग' वापरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com