Nilesh Lanke : 'तू खींच फोटो', खासदार लंकेंचा अमित शाहांबरोबरचा फोटो काढण्याचा किस्सा अन्...

Nilesh Lanke told the story of taking a photo with Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भाजप नेते अमित शाह यांच्याबरोबर फोटो काढतानाचा किस्सा सांगितला.
Nilesh Lanke 1
Nilesh Lanke 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सभा होत आहेत. यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. सभांमध्ये एकमेकांची उणी-धुणी काढली जात आहेत. यातच नेते काही रंजक किस्से देखील सांगत आहेत.

देशाच्या संसदेत पहिल्यादांचा पोचल्यानंतर तिथं भाजप नेते अमित शाह यांच्याबरोबर फोटो काढण्याचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितला. या किस्साचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात भाजपचे (BJP) सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्या अटीतटीची लढत झाली. यात नीलेश लंके विजय होत, खासदार झाले. राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्यात. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले असून, राजकीय सभांचा धुरळा सुरू आहे. यात नेते सभांमध्ये वेगवेगळे किस्से सांगत आहेत. देशाच्या संसदेत पहिल्यादांचा पोचलेले खासदार नीलेश लंके यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर फोटो काढण्याचा किस्सा सांगितला.

Nilesh Lanke 1
Sharad Pawar: रोहित पवारांना 'टार्गेट' करणाऱ्या शिंदेंना पवारांनी भरला दम; 'उभं करायला अक्कल लागते, पण उद्ध्वस्त...'

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात पोचली. पारनेरमधील निघोजमध्ये झालेल्या सभेत खासदार नीलेश लंके यांनी अमित शाह यांच्याबरोबर फोटो काढण्याचा किस्सा सांगताच एकच हशा झाला. कार्यकर्त्यांबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना देखील हसू आवारले नाही.

Nilesh Lanke 1
Ahmednagar Politics : खासदार लंके उखाण्यात कोणाचं नाव घेणार? पाटील 'एबी' फॉर्मवर सही करणार

काय होता किस्सा...

नीलेश लंके म्हणाले, लोकसभेत पहिल्यादांच पोचलो होतो. विधानसभेचा अनुभव होता. त्यामुळे मी बिनधास्त होतो. बीडचे बजरंग सोनवणे, भास्कर भगरे आणि कल्याण काळे यावेळील त्यांच्याबरोबर होते. तेवढ्यात संसदेच्या लाॅबीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या हालचाली वाढल्या. ते लाॅबीमधील काहींना बाजूला करत होते. तिथंच आम्ही बाजूला उभं होते. तेव्हा आम्हाला कळलं की, अमित शाह येत आहेत. आम्हाला कळलं की, कोणतरी मोठा 'मासा' येत आहे.

आमच्यातील काहींनी त्यांच्याबरोबर फोटो काढता येईल का? असं विचारलं. यावर लंके यांनी पुढाकार घेत, समोर जात असलेले अमित शाह यांना साहेब, तुमच्याबरोबर फोटो घ्यायचा आहे, असा आवाज दिला. अमित शाह यांनी देखील, आम्हाला पुढं बोलावलं. यावेळी लंके यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांची ओळख करून देताना, हे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे यांना पाडून आलेत. भास्कर भगरे हे भारती पवार यांना, तर कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना पाडून आलेत. तर मी लंके विखेंना पाडून आलो आहोत, अशी करून दिली.

यावर सभेत एकचा हशा पिकला. भाजप नेते अमित शाह यांनी देखील, 'खूपच डेअरिंग आहे', असं कौतुक केल्याचं लंके यांनी सांगितलं. यावर लंके यांनी 21 लाख मतदारांमधून आलो आहोत, थोडी मागच्या दारानं आलो आहोत, असं म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com