Rahul Gandhi court case
Rahul Gandhi court caseSarkarnama

Rahul Gandhi court case : “राहुल गांधी भारतविरोधी?” भाजप खासदाराचा थेट हल्ला; राजकारणात नवा वाद पेटणार!

Rahul Gandhi in Bhiwandi Court: Anil Bonde Controversial Remark Sparks Row : काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविषयी भाजप खासदार यांनी वादग्रस्त विधान केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Published on

BJP vs Congress latest news : 'RSS'च्या मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी आज महाराष्ट्रातील भिवंडी न्यायालयात हजर झाले. राहुल गांधी यांचा यानिमित्ताने महाराष्ट्रातील दौरा चर्चेत आला, तो म्हणजे टायमिंग साधत भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शने केली.

अमरावतीचे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींविषयी वादग्रस्त विधान केलं. राहुल गांधींचा त्यांनी भारत विरोधी कारवाया करणार नेता, असा उल्लेख केला. या मुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विधानामुळे देशभरात भाजपविरुद्ध काँग्रेस, असे आमने-सामने येण्याची चिन्हं निर्माण झाली आहे.

भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले, "राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशविरोधी आहे. भारताच्या विरोधी आहे. दिल्ली AI समेट इम्पॅक्टमध्ये, सगळ्या देशाची नाचक्की करण्याचं काम, राहुल गांधी आणि त्यांच्या चमच्यांनी केलं. जगामधील AI मध्ये काम करणारे लोकं आलं. नवीन संशोधनासाठी भारतातील नवीन जनरेशन सहभागी झाली होती. सर्वत्र उत्साह होता. अशा ठिकाणी यांची लोकं अर्धे-नागडे होऊन आंदोलन करत होते. तिथं यांच्या चमच्यांना लोकांना धुतले."

"भारताच्या भलं होत असेल, त्या-त्या गोष्टीला नाट लावणं, नाव ठेवणं, निंदा नालस्ती करणे, मोदी द्वेषापोटी हे सर्व करतात. त्यामुळे भारतविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्याला, जो सोरसचा नेता, राजकारण करतो, पैशावर राजकारण करतो, इंडिया-चायना करार करतो पक्षासाठी, अशा नेत्याला जागोजागी काळे झेंडे दाखवून निषेध करायला पाहिजे. फक्त भिवंडीतच नाही, तर प्रत्येक ठिकाणी निषेध करायला हवा," असे भाजप (BJP) खासदार बोंडे यांनी म्हटले.

Rahul Gandhi court case
Muslim reservation issue : मुस्लिम आरक्षणाचा वाद पेटला! धर्मपरिवर्तन करणाऱ्यांना लाभ नकोच! भाजप खासदार बोंडे यांची ठाम मागणी

राज्यातील वाढत्या लव्ह जिहादच्या घटनांवर, खासदार बोंडे यांनी, आंतरधर्मीय विवाह केला जात असेल, तर स्पेशल मॅरेज ॲक्ट करून मुलींच्या पालकांना याबाबत कळवलं पाहिजे. लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर धर्मांतरण होत असेल, तर धर्मांतरण करण्याची परवानगी राज्य शासनाची असली पाहिजे. शासनाला माहिती करूनच धर्मांतरण झालं पाहिजे, असा कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Rahul Gandhi court case
Eknath Khadse : मंत्र्यांविरोधात अश्लील बोलणं भोवलं? गुन्हा दाखल होताच, एकनाथ खडसेंचा पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर हल्लाबोल!

...तर दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा हवी

'खोटे अमिष, प्रलोभन ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून विवाह होत असेल, तर अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळून आलेल्याना किमान दहा वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे. असा कायदाच महाराष्ट्र सरकारने करावा. लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक आणले आहे. मुस्लिमांची संख्या वाढते आणि हिंदूंची संख्या कमी होत आहे. मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी विशेषता मुलींना टार्गेट केलं जातं आहे,' असा गंभीर दावा खासदार बोंडे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com