Eknath Khadse : मंत्र्यांविरोधात अश्लील बोलणं भोवलं? गुन्हा दाखल होताच, एकनाथ खडसेंचा पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर हल्लाबोल!

Eknath Khadse Alleges Charges Against Savda Police in Jalgaon : जळगावमधील शरद पवार राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिस निरीक्षकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घालणं, पोलिस अधिकाऱ्यांना अपमानास्पद बोलणं, लाचलुतपतचा ट्रॅप लावतो, अशी धमकी देणं, महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने पोलिस ठाण्यातच शिवीगाळ करणे आदी प्रकारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा झाला आहे.

हा गुन्हा दाखल होताच, खडसेंनी संबंधित पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकांविरोधात गंभीर मुद्दे पुढे आणले आहेत. खडसेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभाराला आव्हान दिलं आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "वासरं आणली आहेत आता, हा त्यांच्याकडून पैसे घेतो, दहा किंवा पाच गायी मिळाल्या, तर त्यातील फक्त दोन ते तीन गायीची नोंद करतो. काही ठिकाणी गुन्हे नोंदवतो, त्यात देखील एकावर वेगळं, अन् दुसऱ्यावर वेगळं कलम लावतो." ज्याने पैसे कमी दिले, त्यावर जास्त कलम लावतो. ज्यांनी पैसे दिलेच नाही, त्यांना पकडून मध्ये टाकतो. ज्यांनी पैसे दिले, त्यांना कसे सोडवता येईल, तसे कलम लावतो,असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला.

एकनाथ खडसेंनी पोलिस (Police) ठाण्याच्या सहायक निरीक्षकांवर हा गंभीर आरोप करताना, आपल्याकडे अशा फिर्यादी असल्याचा दावा केला. तसंच इथं गायी आणि वासरांची तस्करी पोलिसांच्या मदतीने चालते, असा खळबळजनक आरोप केला. या पोलिस अधिकाऱ्याला कसं राजकीय संरक्षण आहे, हे सांगताना, एकनाथ खडसे यांनी, मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटो असलेला बॅनर समाज माध्यमांवर स्टेटस कसा ठेवला, याचा फोटो दाखवत खळबळ उडवून दिली.

Eknath Khadse
Abhishek Kalamkar case : माजी महापौर अभिषेक कळमकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं होतं...

एकनाथ खडसे हे जळगावमधील सावदा पोलिस ठाण्यात गौण खनिज चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी 11 फेब्रुवारीला गेले होते. तिथं पोलिसांकडून माहिती घेताना, रावेरमधील तासखेडा इथल्या गौणखनिज संदर्भात गुन्हा दाखल का केला नाही? अशी विचारणा केली. या वेळी पोलिसांना अत्यंत अपमानास्पद बोलले. तसेच कारवाई करत नाही म्हणून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो, अशी धमकी दिली. दमदाटी केली. तसंच महाराष्ट्र सरकारमधील मंत्री यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली. ही शिवीगाळ मुख्यमंत्र्यांविरोधात होती, असा अप्रत्यक्ष होती. असा आरोप खडसेंविरोधात पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक विशाल पाटील यांनी केला. यानुसार खडसेंविरोधात गुन्ह्याची नोंद देखील घेतली.

Eknath Khadse
Nashik Crime : जंगलात नेऊन कुणी केला मुलीचा घात? कायद्याच्या बालेकिल्ल्यात थरारक हत्याकांड, नाशिक पोलिसांसमोर नवे आव्हान

खडसेंनी पोलिसांची माफी मागितली होती

दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी सहायक निरीक्षक पाटील यांचे हे सर्व आरोप फेटाळले. गौण खनिज चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि संबंधित नागरिकांच्या तक्रारीवरून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात गेलो होतो. संभाषणादरम्यान अनवधानाने एखादा शब्द चुकीचा निघाला असला तरी त्याबाबत आपण तत्काळ संबंधित पोलिसांची माफी मागितली. आपण कोणत्याही प्रकारे शासकीय कामात अडथळा आणलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

राजकीय वातावरण तापणार?

हे सर्व प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी बोलताना, पोलिस अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण कसे मिळत आहे, याकडे लक्ष वेधले. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा पोलिस अधिकाऱ्याबरोबर असलेल्या फोटो दाखवून, यात राजकीय रंग असल्याचा एकनाथ खडसे यांच्या दाव्यामुळे, पुढे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com