नागपूर : नव्या वर्षाच्या मुहूर्तावर नागपुमध्ये काँग्रेसने (Congress) खांदेपालट केली असून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नॅश नुसरत अली यांची वर्णी लागली आहे. तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होताच दुसऱ्या बाजूला मावळत्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. या बदलावर नाराजी व्यक्त करत मावळत्या महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाई यांनी प्रदेश सचिव या नव्या जबाबदारीचा राजीनामा दिला आहे. तसेच यावर टीका करताना त्या म्हणाल्या, मुंबई व दिल्लीच्या फेऱ्या मारणाऱ्यांना पदे दिली जात आहेत. स्थानिक पातळीवर राबणाऱ्यांवर हा अन्याय आहे.
महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे (Sandhya Sawwalakhe) यांच्या नेतृत्वातील प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. यात बऱ्याच ठिकाणचे शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. यानुसार नागपुरात नॅश अली यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीअवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यानंतर मावळत्या महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाई आणि ग्रामीणच्या मावळत्या अध्यक्ष तक्षशीला वाघधरे यांना प्रदेश सचिवपदी बढती देण्यात आली आहे. प्रदेश महासचिव म्हणून शांता कुमरे, कांता पराते, रीचा जैन, प्रदेश सचिवपदी वैशाली मानवटकर, वर्षा गुजर, पूनम कांबळे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून छाया निमसरकर, नरसीन फतिमा हैदरी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.