

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. ते लढत असलेल्या 9 पैकी तब्बल सहा जागांवर त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतली. सोलापूरमधील उमेदवाराचा अर्ज बाद होण्याचा अपवाद सोडला तर बाकीच्या ठिकाणी उमेदवारांनी सपशेल माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
उमेदवारांनी घेतलेल्या माघारीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी यवतमाळमधून माघार घेणार उमेदवार साहेबराव कांबळे तसेच चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचे पक्षातून निलंबन करत त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द केले आहे.
साहेबराव कांबळे यांनी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे यवतमाळमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी हे बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसने साहेबराव कांबळेंना नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये पक्ष नेतृत्वाला अंधार ठेऊन उमेदवारी मागे घेण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूरचे उमदेवार शैलेश अग्रवाल यांच्यावर देखील हाच ठपका ठेवण्यात आला आहे.
सहा ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. अवघ्या तीन ठिकाणी आता काँग्रेस लढत आहेत. त्यामध्ये नागपूरमधून अतूल लोंढे,अमरावतीमधून हर्षदीप देशमुख आणि धाराशिव लातूरमधून महेश देशमुख हे उमेदवार मैदानात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.