Congress Setback : काँग्रेसला मोठा झटका, विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवाराची माघार, कारणही सांगितलं!

MLC Election MVA Sahebrao Kamble : ठाकरेंच्या उमेदवारीनंतर काँग्रेस उमेदवाराने देखील विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार सहज विजयी होण्याची चिन्हे आहेत.
Congress leader Sahebrao Kamble after announcing his withdrawal from the Yavatmal Legislative Council election, altering the political dynamics of the constituency.
Congress leader Sahebrao Kamble after announcing his withdrawal from the Yavatmal Legislative Council election, altering the political dynamics of the constituency.Sarkarnama
Published on
Updated on

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याचे जाहीर केले. मात्र, आता त्यांचे उमेदवार माघार घेताना दिसत आहे. नाशिकची जागा मविआमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढल जात होती. येथून अनिल कदम यांनी उमेदवार असणार होते. त्यांचे नाव ही निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेत अर्जच दाखल केला नाही.

कदम यांच्या नंतर आता यवतमाळमध्ये मविआमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळे यांनी सपशेल माघार घेतली आहे. कांबळे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या साहेबराव कांबळेंनी महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, असे म्हणत निवडणुकीतून माघार घेतली आहे.

साहेबराव कांबळे म्हणाले, देशाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, खर्गेसाहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेचे तिकीट देणं ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही गौरवाची बाबा आहे. मात्र, सगळी जुळवाजुळव करत असताना महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी आहे. नगसेवकांचया संख्येवर ही निवडणूक अवलंबून आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी संख्या नाही.

Congress leader Sahebrao Kamble after announcing his withdrawal from the Yavatmal Legislative Council election, altering the political dynamics of the constituency.
MLC election : ऐनवेळी उमेदवाराची माघार,125 मते फोडली! धाराशिव-बीड-लातूरमध्ये पुन्हा 'घोडेबाजार' की मोठा उलटफेर? काँग्रेसमुळे सस्पेन्स वाढला?

पुढे बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक लढत असताना साम दाम दंड भेदचा वापर करावा लागतो. या निवडणुकीत नगरसेवक मतदान करत असतात मात्र महाविकास आघाडीकडे नगरसेवकांची तेवढी संख्या नाही. मी फाॅर्म भरला नसता तर मविआकडे कोणी नाही असा संदेश गेला असता. मात्र, संख्याबळ नसल्याने माघार घेतली.

बंडोखोरांना थांबवण्याचे आवाहन

महायुतीमध्ये तब्बल आठ ठिकाणी बंडखोरी झाली आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोरांना बंड थंड करण्याचे आवाहन केले. वरिष्ठ नेत्यांशी बोलून बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत असे ते म्हणाले आहेत.

Congress leader Sahebrao Kamble after announcing his withdrawal from the Yavatmal Legislative Council election, altering the political dynamics of the constituency.
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com