Communist Party of India : 'मविआ'च्या बैठकींना 'डावे' दिसेना; 'माकप' म्हणते, 'तर परिणामांसाठी...'

CPI Uday Narkar reaction that MVA was not taken into confidence in the seat allotment meeting : महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपात विश्वासात घेत नसल्याची माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांची प्रतिक्रिया.
Communist Party of India
Communist Party of IndiaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी मुंबईत मॅरेथॉन बैठकीमधील आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. परंतु या बैठकींसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष वगळता इतर छोट्या मित्र पक्षांना विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत फुटीचं चिन्हं आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे. या जागांबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिल्यानं महाविकास आघाडीत सारं अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Election) घोषणांची येत्या 15 दिवसांत कधीही घोषणा होण्याची शक्यता नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपांच्या चर्चा सुरू झाल्यात. महाविकास आघाडीत मुंबईत दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकांचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु या बैठकांवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे ज्या 12 जागांची मागणी केली असून, यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Communist Party of India
Dinvishesh 1 October : राजीनाम्याचे दबाव तंत्र, काश्मीर विधानसभेवर अतिरेकी हल्ला

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPI) राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीने आपसात जागा वाटप करून घेतलं. त्यानंतर पाठिंबा मागण्यासाठी आले. लोकसभेला जे झाले, तेच आता विधानसभा निवडणुकीत घडते आहे. 'मविआ'ने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी". जागा वाटपांच्या बैठकांमध्ये 'मविआ'तील प्रमुख तीन पक्ष माकप आणि डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. जागा वाटपाच्या प्रक्रियेत डावे आणि पुरोगामी शक्तींना अद्याप समावून घेतलेले नाही. हे मविआसाठी घातक आहे, असा इशारा डॉ. नारकर यांनी दिला आहे.

Communist Party of India
Actor Govinda Political Story : अभिनेता गोविंदाची पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री...!

'मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक विचार आहे. तो राज्यात दिसतो. संघटनेचे जाळे देखील मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले, ते आता विधानसभा निवडणुकीत होऊ देणार नाही. 12 जागांवर कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. 'मविआ'चे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची भेट घेऊन कोणत्या 12 जागा पाहिजेत, याचा सविस्तर लेखी अहवाल दिला आहे. त्यात कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. 'मविआ'कडे मागितलेल्या जागा मर्यादीत आहे. जिथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद आहे, त्याच जागांची मागणी केली आहे', असे उदय नारकर यांनी म्हटले आहे.

या जागांवर डोळा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू (पालघर), कळवण, नाशिक पश्चिम, दिंडोरी व इगतपुरी (जिल्हा नाशिक), सोलापूर (मध्य), अकोले (अहमदनगर), किनवट (नांदेड), पाथरी (परभणी), माजलगांव (बीड), विक्रमगड (पालघर), शहापूर (ठाणे) इथल्या जागेवर दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com