पूर्ण बहुमत नसलेले सरकार स्थापन झाले की मग काय घडू शकतं हे दाखवणारी एक घटना याच दिवशी म्हणजे एक ऑक्टोबर 2000 साली घडला होता. त्यावेळी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली होते.
या आघाडीत भाजपच्या व्यतिरिक्त शिवसेना, शिरोमणी अकाली दर, लोक जनशक्ती पार्टी, समता पार्टी, बिजू जनता दल, द्रवीड मुन्नेत्र कळघम, जनता दल(संयुक्त) आणि अखिल भारतीय तृणमूळ काँग्रेस या पक्षांचा समावेश होता. त्यावेळी या सगळ्याच पक्षांची आपापले महत्त्व ठसवण्याची अहमहिका चालायची.
त्यावेळी तेल व्यवहाराच्या खात्यातील तूट भरून काढण्यासाठी सरकारला इंधन दरवाढ करणे भाग पडले होते. त्यावेळी घटक पक्षाचे नेते नाराज झाले होते. त्यावेळी सरकारमध्ये तृणमूल काँग्रेसचे दोन मंत्री होते. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री होत्या तर अजित कुमार पांजा परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते
सरकारने इंधन दरवाढ जाहीर करताच या दोघांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. पुढे अन्य घटक पक्षांकडूनही दबाव येईल, काही घटक पक्ष जास्तीची मंत्रीपदे मागतील, अशी शक्यता दिसायला लागली तेव्हा सरकारने इंधन दरवाढ अंशतः मागे घेतली आणि 5 ऑक्टोबरला ममता बॅनर्जींनी आपला राजीमाना मागे घेतला.
सन २००० साली १ ऑक्टोबरला आणखी एक भयानक घटना घडली होती. त्या काळात काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया ऐन भरात होत्या. १ ऑक्टोबरच्या त्या दुर्दैवी दिवशी अतिरेक्यांच्या आत्मघातकी पथकाने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या इमारतीच्या मुख्य दरवाजावर कारबॉबचा स्फोट केला.
जैश-ए-महंमद या संघटनेने हा स्फोट घडवून आणला होता. त्यांनी गाडीत स्फोटके ठासून ती गाडी विधानसभा इमारतीच्या प्रवेशद्वारावर धडकवली होती. या स्फोटात ३० जण ठार झाले होते. ज्या वेळी स्फोट झाला त्या वेळी विधानसभा अध्यक्ष अब्दुल वाहद वकील विधानसभेच्या आवारातच होते. त्यांना आणि कर्मचाऱ्यांसहा सुमारे दोनशे जणांना नंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरु होते. सभागृहाचे त्या दिवशीचे कामकाज स्थगित झाल्यानंतर सर्व जण बाहेर पडत असतानाच हा स्फोट घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा डाव होता. पण सुदैवाने ती वेळ अतिरेक्यांना गाठता आली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
1854 - भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले. त्यात पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात व्हिक्टोरिया राणीचे चित्र छापले होते.
1887 - समाजसेवक व उदारमतवादी विचारवंत हृदयनाथ कुंझरू यांचा जन्म. 1927 ते 1930 च्या दरम्यान ते मध्यवर्ती कायदेमंडळाचे सदस्य, तर 1952 ते 1962 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. शिक्षण, रेल्वे, संरक्षण व परराष्ट्रीय धोरण इ. क्षेत्रांत त्यांनी विशेष कर्तबगारी दाखविली.
1995 - नामवंत उद्योगपती, फिरोदिया उद्योगसमूहातील कंपन्यांचे अध्यक्ष व मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष हस्तिमल कुंदनमल फिरोदिया यांचे निधन.
1995 - प्रसिद्ध उद्योगपती व बिर्ला उद्योगसमूहाचे प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन.
1996 - मद्रास शहराचे नामांतर करून "चेन्नई' असे नामकरण करण्यात आले.
1996 - "श्रीलंकेचे गांधी' म्हणून ओळखले जाणारे श्रीलंकेतील ज्येष्ठ समाजसेवक आणि गांधीवादी नेते डॉ. ए. टी.आर्यरत्ने यांना "गांधी शांतता पुरस्कार' जाहीर. यापूर्वी त्यांना मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, जपानमधील निवानो शांतता पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत.
2003 - भारतातर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या गांधी शांतता पारितोषिकासाठी 2003 या वर्षासाठी चेक प्रजासत्ताकाचे माजी अध्यक्ष व्हॅक्लेव्ह हॉवेल यांची निवड. एक कोटी रुपये व मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
2004 - भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकपदाची एअर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय यांनी सूत्रे स्वीकारली. हवाई दलातील त्रितारांकित दर्जाच्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
2004 - आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या रक्षणाची ठाम भूमिका घेणारे; तसेच निर्भीड व निःस्पृह अशी ख्याती असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विद्यारण्य दाजीसाहेब तुळजापूरकर यांचे निधन.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.