Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या तथाकथित भाच्यानं सरकारी ठेकेदारांना लावला चुना; 9 लाखाला गंडवलं

Pune Crime News 9 Lakh Scam in Minister abdul sattar Name: असिफ अत्तार खान यांने आपण मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून अल्पसंख्याक मंत्रालयातून हायमॉक्स लाईटचे काम मिळवून देण्याचे आमिष अहिल्यानगर येथील दोन सरकारी ठेकेदारांना दाखवले होते.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

अल्पसंख्याक मंत्रालयातून काम मिळवून देतो, असे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीने अहिल्यानगर येथील दोन सरकारी ठेकेदारांना सुमारे 9 लाख 40 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असिफ अत्तार खान (रा. कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गोरख रासकर (वय 28, रा. हंगा, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. असिफ अत्तार खान यांने आपण मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून अल्पसंख्याक मंत्रालयातून हायमॉक्स लाईटचे काम मिळवून देण्याचे आमिष अहिल्यानगर येथील दोन सरकारी ठेकेदारांना दाखवले होते.

अल्पसंख्याक मंत्रालयातून हायमॉक्स लाईटचे काम मिळवून देतो, असे असिफ अत्तार खान याने सचिन रासकर आणि त्यांचे मित्र गणेश काळे यांना सांगितले होते. रासकर आणि काळे हे दोघेही सरकारी कंत्राटदार आहेत.

वर्षभरापूर्वी सचिन रासकर आणि गणेश काळे यांची मुंबईतील मंत्रालयात असिफ खान याच्यासोबत ओळख झाली होती. त्याने आपण अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगून मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे दोघांना भासविले. हायमॉक्स लाईट बसवण्याचे काम मंजूर करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

Abdul Sattar News
Bihar Election 2025: माझी काय चूक? पक्षश्रेष्ठींनी सांगावं; टिकीट कापल्यावर महिला आमदाराला अश्रु अनावर!

हे काम मिळवून देण्यासाठी 9 लाख रूपये लागतील, असे खान यांने सांगितले होते. त्यानंतर रासकर व काळे यांनी अहिल्यानगरच्या मार्केटयार्ड येथील काळे यांच्या ऑफिसमध्ये त्याला 8 लाख रूपये रोख दिले. त्यानंतर उरलेल्या रकमेसाठी त्याने वेळोवेळी रासकर यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात 1 लाख 40 हजार रूपये घेतले. खान याने पैसे घेतल्यावर काम देण्यास टाळाटाळ केली. काही दिवसानंतर त्याने फोनला प्रतिसाद देणेही बंद केले.

सचिन रासकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. असिफ अत्तार खान हा मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा नसल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. याप्रकरणी रासकर यांनी

कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

FAQs (प्रश्नोत्तर)

1. फसवणूक किती रकमेची करण्यात आली आहे?
सुमारे ९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

2. आरोपी असिफ अत्तार खानने काय खोटे सांगितले?
त्याने स्वतःला मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाचा असल्याचे सांगितले.

3. कोणत्या कामासाठी पैसे घेतले गेले?
अल्पसंख्याक मंत्रालयातून हायमॉक्स लाईट बसवण्याचे काम मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले गेले.

4. सध्या या प्रकरणाची काय स्थिती आहे?
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com