Cyber Crime : AI फ्रॉडचा कहर, बनावट विश्वास नांगरे पाटलांनी लुबाडले लाखो रुपये !

AI-based cyber fraud in Maharashtra: Fake Vishwas Nangare Patil dupes retired officer in Chhatrapati Sambhajinagar of several lakhs : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याचा वापर करत सायबर ठगांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाखो रुपयांना लुटलं आहे.
Cyber Crime,Vishwas Nangare Patil scam
Cyber CrimeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर मध्ये फसवणुकीची धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याचा वापर करत सायबर ठगांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लाखो रुपयांना लुटलं आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांच्या खात्यावरुन तुमच्या बॅंक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसांत तब्बल 78 लाख 60 हजारांना लुटले. यात AI तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करण्यात आला. तक्रारदाराचा विश्वास बसण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. इतकच नाही तर त्यानंतर 4 जुलै रोजी व्हिडीओ कॉलवर नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने संवाद साधत त्यांना विश्वासात घेतलं.

याप्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 77 वर्षीय तक्रारदार हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना 2 जुलै 2025 रोजी संजय पिसे नावाच्या पोलिस गणवेशातील व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याचं खोटं सांगितलं.

Cyber Crime,Vishwas Nangare Patil scam
Maharashtra MLA funds : राज्यातील 288 आमदारांचे निधीविना हाल, फंडातील विविध कामांना ब्रेक

तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात 2 कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला आहे. त्याच्याकडून तुम्हाला 20 लाख रुपये आल्याने एनआयएकडून गुन्हा दाखल करुन अटक केली जाईल असे घाबरवले.

डिजिटल अरेस्टची भीती सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराला दाखवली. डिजिटल अरेस्ट हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून तुमच्या कुटुंबाला अटक करुन संपत्ती जप्त करण्यात येईल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने 78 लाख 60 हजार रुपये 7 जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या तीन बॅंक खात्यांवर पाठवले.

Cyber Crime,Vishwas Nangare Patil scam
Nashik Gang War: शहरातील गॅंगवॉरचे पोलिसांना आव्हान? गावठी रिव्हॉल्वरचा पोलीस तपास होतो की नाही?

तक्रारदाराचे सर्व पैसे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावर जमा झाले. पवन मेहुरे, करण कुन्हे व आशिक नागफुसे यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात वळते झाले. हे खाते गोंदिया व मुंबईतील शाखांमध्ये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान नांगरे पाटील यांचे नाव घेऊन करण्यात आलेली ही काही पहिलीच फसवणूक नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. जून 2025 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शेअर्स विकायला लावून 60 कोटींचा गंडा घालण्यात आला होता. कोल्हापूरच्या सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडून नांगरे यांच्याच नावाने 3 कोटी रुपये उकळले. त्याच महिन्यात नांगरे यांच्याच नावाने व्हिडीओ कॉल करून बीडमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेकडून 83 लाख रुपये उकळण्यात आले. ऑगस्ट 2024 मध्ये याच पद्धतीने ज्येष्ठ महिलेकडून 23 लाख रुपये उकळण्यात आले. विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com