

अमित गवळे
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वचजण एकमेकांना व्हॉट्सअप व समाज माध्यमांवर शुभेच्छा देतात. मात्र बुधवारी (ता. 31) मध्यरात्री पासून ते १ जानेवारी २०२६ या काळात सायबर गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाखाली सायबर फसवणूकीची शक्यता असल्याने नागरिकांना पोलीस प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी याबाबत नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की ही माहिती आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर लगेच शेअर करा आणि सर्वांना होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा असे देखील त्यांनी सांगितले.
धोका काय आहे?
तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा मेसेजद्वारे "Happy New Year" किंवा "नववर्षाच्या शुभेच्छा" अशा नावाने एखादी APK File, PDF किंवा Document File येऊ शकते.
काय करू नये?
अशा कोणत्याही फाईल्स Download, Install किंवा Open करू नका. हा मेसेज अनोळखी नंबरवरून किंवा तुमच्या ओळखीच्या (Saved Contacts) व्यक्तीकडूनही येऊ शकतो (कारण त्यांचा मोबाईल आधीच हॅक झालेला असू शकतो)
फाईल उघडल्यास काय होऊ शकते?
ही APK फाईल इंस्टॉल करताच तुमच्या मोबाईलचे पूर्ण नियंत्रण हॅकर्सकडे जाते आणि मोबाईल हँग होतो. तुमच्या मोबाईलवरून आपोआप हाच व्हायरस (Virus) तुमच्या इतर सर्व ग्रुप्सवर आणि संपर्कातील लोकांना पाठवला जातो.
तुमचे PhonePe, Google Pay, Paytm किंवा Amazon सारखे बँकिंग ॲप्स हॅक केले जातात. काही सेकंदात ७ ते ८ OTP येतात आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पैसे डेबिट झाल्याचे SMS हॅकर्स डिलीट करतात, त्यामुळे फसवणूक झाल्याचे तुम्हाला समजतही नाही.
उपाय (जर चुकून क्लिक झालेच तर)
जर चुकून फाईल डाऊनलोड झाली आणि मोबाईल हँग झाला, तर:
सर्वात आधी मोबाईलचे इंटरनेट (Data/Wi-Fi) त्वरित बंद करा.
ती संशयास्पद फाईल किंवा ॲप शोधून लगेच Uninstall किंवा Delete करा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.