Bahujan Vikas Aghadi : तावडेंना घेरणाऱ्या ठाकुरांना सर्वात मोठा धक्का; भाजपने उमेदवारालाच फोडले

Bahujan Vikas Aghadi Candidates Suresh Padvi Join BJP: विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी गंभीर आरोप केला आहे. जवळपास पाच तास यावरून गोंधळ सुरू होता.
Suresh Padvi, Hitendra Thakur
Suresh Padvi, Hitendra ThakurSarkarnama
Published on
Updated on

Dahanu Assembly Constituency: बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटल्याच्या आरोपाखाली घेरत असतानाच भाजपने ठाकुरांचाच उमेदवार फोडला आहे. डहाणूतील बविआच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश करत ठाकुरांना मोठा झटका दिला आहे.

मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना बविआचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजप उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बविआला मोठा धक्का बसला असून भाजपचे पारडे जड झाले आहे. मतांमध्ये फुट होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे पाडवी यांनी म्हटले आहे.

Suresh Padvi, Hitendra Thakur
Vinod Tawde Money Distribution : पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाडवी म्हणाले, या भागाचा विकास मागील पाच वर्षांपासून खुंटला आहे. त्यामुळे मी भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहे. मते खाण्यापेक्षा एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून दिले तर मागील पाच वर्षांपासून खुटंलेला विकास होईल, अशी आशा आहे. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिल्याचे पाडवी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, डहाणू मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सीपीआयएमचे विनोद निकोले हे उमेदवार आहेत. तर भाजपने विनोद मेढा यांना मैदानात उतरवले आहे. मागील निवडणुकीत निकोले यांचा विजय जेमतेम पाच हजार मतांनी झाला होता. पाडवी यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक तिरंगी बनली होती. ते किती मते खाणार, त्याचा फटका कुणाला बसणार, याबाबत उत्सुकता वाढली होती.

Suresh Padvi, Hitendra Thakur
Vinod Tawde Money Distribution : पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आता पाडवी यांनी या मतदारसंघातून भाजपला पाठिंबा दिल्याने निकोले विरुध्द मेढा अशी थेट लढत होणार आहे. भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद लावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांच्याही सभा झाल्या आहेत. त्यातच भाजपने पाडवी यांना आपल्यासोबत आणत मतांच विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती मते कुणाच्या पारड्यात पडणार, हे 23 तारखेला समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com