Akola News : आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाची चर्चा सुरु झाली असताना दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरु झाली नाही. त्यातच मनसे, वंचितनंतर आता राज्यातील महायुतीतील एका पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचणी सुरु केली आहे.
महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार, असा इशारा माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar)यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु होण्यापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी जानकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याची भेट घेतली होती. त्यांनी आघाडीकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीतीकडून उमेदवारी दिल्याने ते महायुतीसोबत होते. यावेळेस पण त्यांनी 50 जागांची मागणी करीत आघाडी घेतली आहे.
अकोल्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा गुरूवारी अकोल्यात साजरा होणार आहे. त्यातच आता महादेव जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला आता राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने संसदीय मंडळाला स्वबळावर लढण्याची शिफारस केली तर पक्ष त्या निर्णयासोबत असेल, असे जानकर यांनी अकोल्यात माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
महायुतीचा घटक पक्ष असलो तरी आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 50 जागा ना दिल्यास स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. राष्ट्रीय समाज पक्षानं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. ही तयारी पूर्ण झाल्याची माहिती जानकर यांनी दिली.
महायुतीकडे 50 जागांची मागणी रासपने केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे. त्यामुळे महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार, असा इशारा महादेव जानकर यांनी दिली होता. त्याशिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकला होता.
येत्या काळात राजकारणाच्या माध्यमातून उपेक्षित लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारा आमचा पक्ष आहे. गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे वंचित समाजाला संधी देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवू असेही जानकर म्हणाले. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीच्या निर्णयानंतर घेतला जाईल. पण सध्या तरी 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.