Maratha Reservation : संभाजीराजेंची मोठी मागणी; टिकणारे आरक्षण म्हणजे काय सरकारने स्पष्ट करावे

Chatrapati SambhajiRaje : नववर्षाच्या निमित्ताने ट्विटच्या माध्यमातून केली राज्य सरकारची कोंडी
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Political News : राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी चार महिन्यापासून आंदोलन केले जात आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्वत्र वातावरण तापले आहे. काही ठिकाणी तर अजूनही राज्यकर्त्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.

चार महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी दोनवेळा उपोषण करीत सरकारची कोंडी केली. आता याच प्रश्नावरून नववर्षाच्या निमित्ताने माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकाकडे मोठी मागणी केली आहे.

Chhatrapati Sambhajiraje
Vinayak Mete: ...अन् दिवंगत मेटेंच्या पत्नी-मुलगा व्यासपीठावरच एकमेकांच्या गळा पडून रडले

मराठा समाजाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र, अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार का ? असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे.

कुणाला धक्का न लावता याचा अर्थ ५०% च्या वर देणार, पण यापूर्वी दोनदा असे आरक्षण टिकलेले नाही, मग नेमके आरक्षण देणार कसे ? टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय ? हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. किमान येत्या वर्षाच्या सुरूवातीला तरी आपल्या संघर्षाला यश मिळेल, अशी अपेक्षा मराठा समाज बाळगून आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणारे नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली जात असल्याचे ही छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com