Devendra Fadnavis : विधानपरिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात 23 हजार 628 पोलीस भरती

Political News : 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly SessionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur session : राज्यात नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच येत्या काळात राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीवेळी दिली.

Maharashtra Assembly Session
Loksabha Election : तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीत भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न'

विधान परिषदेत पोलीस शिपाई भरती करण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी आमदार भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 23 हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

आगामी काळात राज्यात नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती केली जाणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार जणांना प्रशिक्षण

सायबर (Cyber Crime) सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार आहे. लोकसंख्यनुसार आता किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

Maharashtra Assembly Session
DCM Devendra Fadanvis News : विरोधकांच्या टीकेने सामान्यांची पोट भरणार नाहीत ; फडणवीसांनी सुनावले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com