DCM Devendra Fadanvis News : विरोधकांच्या टीकेने सामान्यांची पोट भरणार नाहीत ; फडणवीसांनी सुनावले..

Marathwada Political News : त्यांना टीका करू द्या, राजकारण करू द्या. आम्ही मात्र लोकांसाठी काम करत राहू.
Dcm Devendra Fadanvis News
Dcm Devendra Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : रोज सकाळी एक भोंगा सुरू होतो, त्यानंतर रात्रभर वेगवेगळे भोंगे सुरू असतात. विरोधकांनी टीका करावी, पण तुमच्या टीकेने शेतकऱ्यांचे भले होणार आहे का? मजुरांच्या पोटाला दोन घास मिळणार आहेत का ? असा सवाल करत तुमच्या टीकेला आम्ही घाबरत नाही. (DCM Devendra Fadanvis Speech News) अठरा अठरा तास सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन आणल्याशिवाय आम्ही तिघेही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Dcm Devendra Fadanvis News
CM Eknath Shinde News : असा झटका दिला, की ऑनलाइनवाले लाईनवर आले ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला..

विरोधक टीका करतात पण काय दिशा असली पाहिजे? जनतेसाठी योग्य काय आहे? हे मात्र ते सांगू शकत नाही, असेही फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. परभणी येथील `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमात फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता फडणवीस चांगलेच बरसले.

राज्यातील शेतकरी, कामगार, मजुर, महिला, तरूण अशा सर्वच वर्गासाठी राज्यातील सरकार काम करत आहे. (Parbhani) अठरा अठरा तास काम करून आम्ही तिघेही सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणल्याशिवास स्वस्थ बसणार नाही. पण काही लोकांना फक्त टीका करायची असते. (BJP) मी देखील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. वर्षानुवर्षे विरोधक म्हणून टीका केली, पण सरकारच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक देखील केले.

आता विरोधक नसतं सरकारकडे बोट दाखवतात, टीका करतात. पण राज्याला दिशा देण्यासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल मात्र ते काहीही सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही घाबरत नाहीत, त्यांना टीका करू द्या, राजकारण करू द्या. आम्ही मात्र लोकांसाठी काम करत राहू, याचा पुनरुच्चार देखील फडणवीसांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com