

Nagpur Marathi vs Mumbai Marathi debate: विधिमंडळात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय आमदारांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले होते.
त्यानुसार, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरची 'काबे-साल्या' मराठी बोलताना मुंबईत, विशेष करून पुण्यात कशी अडणच व्हायची, हे सांगताच विधिमंडळात एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विधिमंडळात (Vidhan Bhavan) अनेक विनोदांना जन्म देणारं असतं. राजकीय क्षेत्रातील घटना, अन् त्याच्याबरोबर येणारे विनोद हे वगळले, तर मराठी नाटकं, चित्रपटांच्या कथानकांमध्ये 50 टक्के घट येईल. इतका मसला आपण राजकीय लोक साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे कुठेतरी आपण देखील साहित्याची निर्माती आपण देखील करत असतो."
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "विधिमंडळात अनेक विनोदांना जन्म देणारं असतं. राजकीय क्षेत्रातील घटना, अन् त्याच्याबरोबर येणारे विनोद हे वगळले, तर मराठी नाटकं, चित्रपटांच्या कथानकांमध्ये 50 टक्के घट येईल. इतका मसला आपण राजकीय लोक साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे कुठेतरी आपण देखील साहित्याची निर्माती आपण देखील करत असतो."
"पूर्वीच्या काळात राजकीय नेत्यांकडून जी काही भाषणं व्हायची, त्यात विनोद, कोट्या, व्यंग, असे अनेक अंग अन् छटा पाहायला मिळायच्या. अगदी 20 ते 25 वर्षांत, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंढे यांच्या भाषणामधून निर्माण होणारे विनोद, कोट्या पाहिल्या आहेत. आता देखील आपल्या अनेक सदस्यांची भाषण तशापद्धतीची होतात. पण आता विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं, यामुळे विनोदातील मर्म देखील निघून जातं. यामुळे माणूस घाबरून घाबरून विनोद करायला लागला आहे. या विनोदाचा नेमका काय अर्थ निघेल अन् दिवसभर माध्यमांमध्ये चालेल हे देखील सांगता येत नाही, त्यामुळे कुठेतरी राजकीय सदस्यांच्या भाषणातील निखळ आनंद कमी झाला आहे," अशी टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
'मराठी भाषेची श्रीमंत मोठी आहे. मराठी भाषा महाराष्ट्रात प्रत्येक सात किलोमीटर अंतरावर बदलते. आपण विदर्भातून मुंबई आल्यानंतर, नागपुरी मराठी भाषेमुळे सुरवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. शब्दा-शब्दाला, 'का बे-साल्या', असं सांस्कृतिक मराठी बोलायचो. पण ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात बहिष्कृतच केलं जाईल, यानंतर हळूहळू चांगलं मराठी कसं बोलता येईल, यावर काम केलं,' मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगताच विधिमंडळात एकच हशा पिकला.
"मराठी भाषा, साहित्याने खूप काही दिलेलं आहे. इतिहास पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्व-भाषेचा अभिमान आपल्याला सांगितला. छत्रपती शिवरायांनी राज्य कारभार चालवला, तेव्हा मराठी भाषा शुद्ध झाली पाहिजे, या करिता शब्दकोष तयार केला. प्रशासन चालवण्यासाठी जी मराठी भाषा होती. त्या मराठी भाषेवर फारशीचं, अरबीचं अन् वेगवेगळ्या भाषेचं आक्रमक होतं. अशी प्रदूषित झालेली मराठी भाषा, पूर्णपणे शुद्ध करून, त्यासंदर्भात एक कोष निर्माण करून, एक प्रमाण भाषा काय आहे हे छत्रपतींनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे भाषेचा अभिमान छत्रपती शिवरायांपासून सुरू होते," असे ठामपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.