Ajit Nawale Kisan Sabha Long March : ‘शेतकरी संप’ विसरू नका! आता कष्टकरी रस्त्यावर; विखेंच्या लोणीतून उठणार बंड, अजित नवलेंचा थेट इशारा

Long March Led by Ajit Nawale to Reach Vikhe Loni Village : शालेय पोषण आहार कर्मचारी, शेतकरी, कामगार. आशासेविकांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला लाँग मार्चचा आज चौथा दिवस असून, आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावी धडकणार आहे.
Ajit Nawale  Long March
Ajit Nawale Long MarchSarkarnama
Published on
Updated on

Kisan Sabha March in Loni : शालेय पोषण आहार कर्मचारी, शेतकरी, कामगार, आशासेविकांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला लाँग मार्चचा आज चौथा दिवस आहे. किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लाँग मार्चची दाहकता वाढली आहे.

कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अजित नवले यांनी थेट संपाचा इशारा देताना, सत्ताधाऱ्यांना पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांच्या संपाची आठवण करू दिली. अजित नवले यांनी ही आठवण नेमकी अधिवेशन काळात करून देणे म्हणजे, सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवणे, अशी आहे.

अजित नवले म्हणाले, "पूर्वी शेतकरी (Farmer) संपाची ठिणगी पुणतांबा इथून पडली होती. आता शालेय पोषण आहार कर्मचारी, शेतकरी, कामगार, आशासेविका आदी विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दुसरा मोठा संप जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावापासून महाराष्ट्रभर सुरू होणार होईल."

सरकारकडे (Government) प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राजूर इथून निघालेला शेतकरी-कामगारांचा लाँग मार्च संगमनेर शहरात दाखल झाला. प्रांत कार्यालयाच्या आवारात, तसंच नवीननगर रस्त्यावर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या देत मुक्काम केला. तिथं प्रांताधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या मोर्चात राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ajit Nawale  Long March
Rajya Sabha Election : "मुंबईला निघालोय, जयंतरावांना भेटतोय", बाळासाहेब थोरातांचे 'सरकारनामा'शी बोलताना सूचक संकेत; राज्यसभेसाठी 'मातोश्री' ते 'यशोधन' हालचाली!

डॉ. नवले म्हणाले, “पाच वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर बैठका झाल्या. काही निर्णय समाधानकारक झाले असले, तरी ते शंभर टक्के नाहीत. आपल्या लढ्याला यश येत आहे, पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही.”

Ajit Nawale  Long March
Nashik Pune railway route change : नाशिक–पुणे रेल्वे मार्गात घोळ? सरळ मार्गाला वळण कोणी आणलं; सत्यजीत तांबेंचा थेट हल्ला, फडणवीसांची मोठी घोषणा!

आज मोर्चा भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव असलेल्या लोणीत दाखल होणार आहे. मंत्री विखे पाटील यांच्या लोणी इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या देत आंदोलन छेडले जाणार आहे. “जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत उठणार नाही. आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र राहील,” असा निर्धार नवले यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com