Devendra Fadnavis Letter : 'ओला दुष्काळ' जाहीर करा, फडणवीसांचे जुने पत्र व्हायरल; वडेट्टीवारांचा थेट मुळावर घाव!

Vijay Wadettiwar Criticized Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दु्ष्काळ हा शब्द वापरता येणार नाही, असे म्हटले होते. मात्र, ते विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे त्यांचे पत्र व्हायरल झाले आहे.
Vijay Wadettiwar Criticized Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar Criticized Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत बोलताना ओला दुष्काळ हा शब्द वापरता येणार नाही. तो बोलीभाषेतील शब्द असून नियमावलीत असा शब्द नाही, असे सांगितले होते. आपत्ती व्यवस्थापन (मॅन्यूअल) मध्ये देखील असा शब्द नसल्याचे म्हटले होते.

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल पत्रच आपल्या ट्विटवरून शेअर करत फडणवीस शब्दांचा खेळ करत असल्याची टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत पत्र लिहिले होते.आज त्यापेक्षा दहा पटीने गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे म्हणून आम्ही जेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतो, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस सांगतात ओला दुष्काळ ही संकल्पना नाही, नियमावलीत असा शब्द नाही, ओला दुष्काळ कधीच जाहीर केलेला नाही!'

Vijay Wadettiwar Criticized Devendra Fadnavis
Satej Patil : हक्कभंगाचा इशारा देणाऱ्या आमदारांना सतेज पाटलांनी विचारला जाब

'मग प्रश्न असा आहे की, विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ ही संकल्पना होती, आणि सत्तेत आल्यानंतर ती संकल्पना नष्ट होते का? शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. आज शेतकरी संकटात आहे. त्याला निकषांपुढे जाऊन, सरसकट व भरीव मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे.', असे देखील ते म्हणाले.

किती दिवस वेड्यात काढणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला सुनावले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी लाखो रुपयांचा तर निनावी जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जातो. दोन्ही हातांनी मलिदा खाता यावा म्हणून पुण्याचा रिंग रोड १७ हजार कोटींवरून ४२ हजार कोटींवर नेता येतो, एमएसआयडीसीमार्फत २५ हजार कोटींच्या वर्क ऑर्डर देता येतात, महामार्गाचं टेंडर १५ टक्क्यांनी वाढवता येतं, निवडणुकीत उमेदवारांना खोकेच्या खोके देता येतात, पण सामान्य जनतेला द्यायची वेळ आली की मात्र तिजोरीत खडखडाट असतो. अजून किती दिवस महाराष्ट्राला वेड्यात काढणार?

Vijay Wadettiwar Criticized Devendra Fadnavis
Imtiaz Jaleel News : 'रोडकरी' नितीन गडकरींना इम्तियाज जलील यांचे आव्हान; छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्यावरून एकदा प्रवास कराच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com