Devendra Fadnavis: आताच्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...

Devendra Fadnavis on Maratha Reservation: '..पण माझा सवाल एवढाच आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले 'हे' लिखीत द्यायला तयार आहेत का?' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. अशात आता मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांच्या कायम निशाण्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी साम मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना आताच्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? या प्रश्नावर त्यांचं मत मांडलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'दोन गोष्टी आहेत. एकतर पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की, आता मराठा समजाला आरक्षण आहे. दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने दिलं आहे आणि त्यानुसार भरती देखील झालेल्या आहेत. त्यानुसार प्रवेशही मिळालेले आहेत. लोक शिकत आहेत, नोकरी करत आहेत. न्यायालयाने हे आरक्षण नाकारलेलं नाही.'

तसेच 'आता प्रश्न काय आहे, आपण जर या आरक्षणाच्या संदर्भात समजून घेतलं. आरक्षणाची मागणी कधी सुरू झाली?१९८० साली. १९८२ साली अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं, की तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर माझं जीवन संपवेन. मिळालं नाही म्हणून स्वत:ला गोळी मारून घेतली. तिथपासून ते २०१४ पर्यंत जवळपास ३२-३४ वर्षे ही लढाई सुरू होती. चार-चारवेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले. साडेचार वर्षांचा अपवाद सोडता, पूर्णकाळ काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. पण त्यांनी आरक्षण दिलं नाही. लक्ष देखील दिलं नाही. आयोगाचा साधा रिपोर्ट देखील मराठा समाजाच्या बाजूने आला नाही.' असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: मनोज जरांगेंच्या निवडणुकीतून माघारीच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

याचबरोबर 'यानंतर २०१४मध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो. आपण आयोग तयार केला. आयोगाने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय़ केला. नंतर आपण आरक्षण दिलं, उच्च न्यायालयाने आरक्षण वैध असल्याचं सांगितलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयाने देखील हे आरक्षण वैध ठरवलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं (MVA) सरकार आलं, आरक्षण गेलं. मग पुन्हा नवीन सरकारमध्ये आम्ही दिलं आणि एवढंच करून आम्ही थांबलो नाही.

आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि या महामंडळाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी एक लाख मराठा तरुणांना उद्योजक केलं. 'सारथी'ची स्थापना केली. सारथीमधून अनेक मराठा समाजाचे विद्यार्थी किंवा तरूण आयएएस, आयपीएस झाले. प्राचार्य झाले एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे मराठा समजाच्या कल्याणासाठी विविध योजना केवळ आम्ही राबवल्या.' असा दावाही फडणवीसांनी केला.

तसेच 'आज जे लोक या ठिकाणी बोलत आहेत, इतक्या वर्षांच्या त्यांच्या राज्यात मराठा समाजासाठी त्यांनी केलेलं एक तरी कल्याणकारी काम ते दाखवू शकतात का? राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं आहे का? राजकारणही जे केलं ते प्रस्थापित मराठ्यांचं केलं, विस्थापित मराठ्यांचं राजकारण तरी त्यांनी कधी केलं का?' असा सवाल यावेळी फडणवीसांनी विचारला.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Elective Merit: ...अन् फडणवीसांनी सांगितलं 'इलेक्टिव्ह मेरिट' म्हणजे नेमकं काय असतं?

तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले 'त्यामुळे माझं अगदी स्पष्टपणे मत आहे, की या सगळ्या लढाईत. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची मागणी काय आहे? तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. मी प्रत्येकवेळी सांगतो, एका मिनिटासाठी आपण मान्य करूयात की देवेंद्र फडणवीस अत्यंत नालायक माणूस आहे, पण माझा सवाल एवढाच आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे लिखीत द्यायला तयार आहेत का? की त्यांचं सरकार आल्यानंतर ते मराठा समजाला ओबीसीमध्ये आरक्षण देतील. लिखीत जाऊ द्या, तोंडाने तरी बोलायला तयार आहेत का? त्यांना अनेकवेळा प्रश्न विचारला, प्रश्नाला बगल दिली, त्यांनी कधीतरी उत्तर दिलं का?'

याशिवाय, 'मग शेवटी जर अशाप्रकारची परिस्थिती आहे की, ज्यामध्ये तुमची बाजू घेता मला लक्ष्य करतात करा, मला समजतं की मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करत नाहीत केवळ मला करतात. राजकीयदृष्ट्या मी एवढा परिपक्व आहे, त्याचा मला अर्थ कळतो, ते मला का टार्गेट करतात.

मला काही अडचण नाही. पण किमान तुम्ही मराठा समासाठी सच्ची लढाई लढता आहात, तर यांना एकदा विचारा ना. त्यांच्याकडून लेखी घ्या किंवा त्यांना बोलायला तर सांगा. त्यांनाही तुम्ही बोलायला सांगणार नाही आणि फक्त मला टार्गेट कराल, तर जनतेला समजणार नाही का? जनता एवढी भोळी आहे? मराठा समजाला काही समजत नाही? हा फार हुशार समाज आहे, या समजाला सगळं समजतं.' असं म्हणत फडणवीसांनी आपलं मत मांडलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com