Maratha Reservation : जरांगेंनी उपोषण सोडताच CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "काही निर्णय..."

CM Fadnavis on Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. या काळात गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी जीआर काढावा, हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित जीआर काढावा आणि शिंदे समितीकडे असलेल्या 58 लाख नोंदी कमी करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर गुरूवारी (ता.१७) स्थगित करण्यात आलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

जरांगे यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याचा मला आनंद आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सरकार आणि जरांगे यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. जरांगे यांच्या 13 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारने यापूर्वीच मान्य केल्या होत्या, असं फडणवीस म्हणाले.

एका मागणीच्या संदर्भात कायदेशीर अडचणी असल्याचं सरकारकडून मनोज जरांगेंना सांगण्यात आलं होतं. मात्र, ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्याची सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच, सरकारच्या समितीकडून देण्यात आलेली आश्वासनंही पूर्ण केली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Pune BJP : मंत्री मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमधील धुसफूस मिटली की वाढली; महापालिकेत पदाधिकाऱ्यांचे 'शीतयुद्ध' सुरूच?

काही निर्णय यापूर्वीच घेण्यात आले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीदरम्यान काही प्रशासकीय अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याचं काम सरकार करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं सांगत चर्चेसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले असल्याचं नमूद केलं. मराठा समाजासाठी आपण आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णय घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil
Teacher Constituency Election : शिवसेनेच्या मंगेश चिवटेंचा राजकीय बळी देण्याची तयारी : पदवीधर-शिक्षकसाठी मंत्री मुश्रीफांची भाजपला नवी ऑफर

दरम्यान, जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. या काळात गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासाठी जीआर काढावा, हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित जीआर काढावा आणि शिंदे समितीकडे असलेल्या 58 लाख नोंदी कमी करू नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास मुंबई गाठण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील 90 दिवसांत सरकारकडून या मागण्यांवर कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com