Dhananjay Munde and Karuna Sharma love story : धनंजय मुंडे अन् करूणा शर्मांची पहिली भेट होती अगदी फिल्मी ; जाणून घ्या, 'Love Story '

Karuna Sharma latest news : करूणा शर्मा या मुंडे कशा झाल्या, कुटुंबीयांची काय होती भूमिका, लग्न कुठे झालं अन् पुढे काय काय घडलं?
Dhananjay Munde and Karuna Sharma love story
Dhananjay Munde and Karuna Sharma love storysarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde and Karuna Munde relationship : करूणा मुंडे यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्यांचे संबंध आणि ते कशाप्रकारे एकत्र आले, लग्न केलं आणि २७ वर्षे सोबत राहिले याबाबत सगळंच सांगितलं. त्यामध्ये करूणा मुंडे यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीबाबतही सांगितलं.

करूणा मुंडे म्हणाल्या, ‘’मी धनंजय मुंडेंना भेटले तेव्हा मी केवळ १६ वर्षांची होती. मी केवळ नववी पास होते आणि मी शिक्षणही सोडले होते. एक महंत होते, भय्यू महाराज त्यांचा इंदुरमध्ये सुकल्या ग्राममध्ये आश्रम होता. त्यांच्या आश्रमात गोपीनाथ मुंडे(Gopinath munde) आणि धनंजय मुंडे दोघेही आणि महाराष्ट्रातील सर्वच मोठमोठे मंत्री तिथे यायचे. तिथे आमच्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. मी कधीच आश्रमात जात नसे, परंतु एकदा मी माझ्या आईसोबत तिकडे गेले होते. तेव्हा धनंजय मुंडे आणि माझी अचानकपणे ओळख झाली. एवढंच नाहीतर आमची टक्कर झाली होती. असं सगळं आमचं एकदम फिल्मी आहे. पुढे आमचं इंदुरमध्ये लग्न झालं आणि ते मला मुंबईत घेवून आले होते. मी मूळची इंदुरची आहे.  माझं जन्मस्थान हे इंदुर आहे. मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा माझी सगळी व्यवस्था राहणं, खाण्याची सोय ही माझ्या नवऱ्याने म्हणजेच धनंजय मुंडेंनीच केली होती.’’

Dhananjay Munde and Karuna Sharma love story
Nashik Guardian Minister : मंत्री महाजनांनी पालकमंत्रीपदाचं जवळपास गृहितच धरलंय? म्हणाले, 'लवकरच जाहीर...'

पुढे ''आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही भाड्याने गोरेगावमध्ये राहिलेलो आहोत. त्यावेळी धनंजय मुंडे(Dhananjay Munde) हे पुण्यात सिम्बॉयोसिस कॉलेजमध्ये लॉ करत होते. त्यावेळी मुंबईतही होते आणि इंदुरमध्येही असायची. कारण, त्यांनी काय सांगितलं होतं, तू नववी पास आहे आणि मी लॉ करत आहे. आपलं भवितव्य खूप चांगलं आहे, तू आणखी शिक्षण घे आणि त्यांनी माझं शिक्षणही सुरू करून दिलं. कारण, तू अभ्यासात ढ राहू नये, मला असं आवडत नाही, माझं कुटुंब तुला स्वीकारणार नाही. मी चांगल्या मनाने स्वीकारलं आणि मी परत पुढील शिक्षण सुरू केलं.'' असंही करूणा मुंडे म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडेंना, करूणा शर्मा अन् धनंजय मुंडेंबाबत माहिती होती का? -

याशिवाय ''त्यांना सगळं माहिती होतं. पण त्यामध्ये एक गोष्ट आहे की आम्ही दोघेही खूप लहान होतो आणि तारूण्याच्या उत्साहात आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं. मी ब्राह्मण समाजाची होती, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मी मान्य नव्हते. परंतु त्यांना मान्य होतं. मला केवळ माझ्या नवऱ्याशीच घेणंदेणं होतं. माझ्या आईला देखील हे लग्न मान्य नव्हतं. माझ्या घरच्यांनाही हे मान्य नव्हतं.'' असंही करूणा मुंडेंनी(Karuna Munde) सांगितलं.

Dhananjay Munde and Karuna Sharma love story
Karuna Sharma On Dhananjay Munde : तो गंभीर आरोप अन् धनंजय मुंडेंवर बोलता बोलता करुणा मुंडे ऑनकॅमेरा ढसाढसा रडल्या

याचबरोबर ''पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली, त्यानंतर दुसऱ्याच भेटीत ते माझ्या घरी आले आणि माझ्या आईसमोर आमच्या लग्नाचा विषय मांडला व म्हणाले की मी हिच्याशी लग्न करणार आहे. तुम्ही दुसऱ्या कुणासोबत हिंच लग्न लावायचा विचारही करू नका. त्यानंतर आम्ही घरच्यांचा विचार न करता आम्ही दोघे एकमेकांसोबत २७ वर्षे राहिलो. आम्ही पळून जाऊन इंदुरमध्ये एका मंदिरात लग्न केलं.'' अशीही माहिती करूणा मुंडे यांनी मुलाखतीत दिली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com