Karuna Sharma On Dhananjay Munde : तो गंभीर आरोप अन् धनंजय मुंडेंवर बोलता बोलता करुणा मुंडे ऑनकॅमेरा ढसाढसा रडल्या

Karuna Sharma Munde News: मी मीडियासमोर पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि न्यायाधीश सगळीकडून मुलांची शपथ घेऊन सांगते की,जर मी खोटं असेन,त्याची पहिली बायको नसेल,त्यांना 15 लाख दिले नसतील, तर माझी कॅमेऱ्यासमोर नार्को टेस्ट करा,असं खुलं चॅलेंजही करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना यावेळी दिले.
Karuna Sharma
Karuna SharmaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.यानंतरही त्यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.अशातच आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले आहेत.पण त्याचवेळी काही खासगी गोष्टी सांगताना त्या ऑनकॅमेरा ढसाढसा रडल्या.

करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma- Munde) यांची साम वृत्तवाहिनीवरील 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात आल्या होत्या.यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंसोबतचं रिलेशन,वाद, वाल्मिक कराड यांसह विविध गोष्टींवर रोखठोक भाष्य केलं. तसेच धनंजय मुंडेंना खुलं आव्हानही दिलं. यावेळी त्यांनी आपण आपलं घर आणि आईचे दागिने विकून धनंजय मुंडेंना 15 लाख रुपये दिल्याचा गंभीर आरोपही केला.

करुणा शर्मा-मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे एक दिवस आले आणि म्हणाले,माझ्या हृदयामध्ये छिद्र आहेत. त्याचं मला ऑपरेशन करायचं आहे.त्यासाठी मी लंडनला जाणार असून या ऑपरेशनला 40 लाखांचा खर्च आहे. त्यावेळेस मी त्यांना माझं एक घर जे माझ्या आई वडिलांनी माझ्या नावावर केलं होतं. त्याची किंमत त्यावेळी जवळपास 12 लाख रुपये होती. पण ते अवघ्या 9 लाखांना विकले.

Karuna Sharma
Devendra Fadnavis Solapur Tour : फडणवीसांनी नाकारला आपल्या प्रिय आमदाराचा पुष्पगुच्छ; कारणही आले पुढे! (Video)

तसेच माझ्या आईचे जे काही दागिने होते,ते विकत घेऊन ते विकले. असे एकूण 15 लाख रुपये त्यांना दिले. ही गोष्ट जी आहे ती 2001 मध्ये घडली होती. पण सगळ्या गोष्टी ह्या आता समोर आल्या आहेत. सगळं खरं-खोटं हे 2021 मध्ये समोर आलं. असं कुठलंही ऑपरेशन त्यावेळी झालं नव्हतं.मला त्यावेळी खोटं सांगितलं होतं.

मी मीडियासमोर पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि न्यायाधीश सगळीकडून मुलांची शपथ घेऊन सांगते की,जर मी खोटं असेन,त्याची पहिली बायको नसे,त्यांना 15 लाख दिले नसतील, तर माझी कॅमेऱ्यासमोर नार्को टेस्ट करा,असं खुलं चॅलेंजही करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांना यावेळी दिले.

Karuna Sharma
Prashant Koratkar Issue : कोरटकरवर हल्ला, भुजबळ यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'वकीलांनाही भावना...'

ज्यावेळी तुम्ही त्यांच्याविरुद्ध केस दाखल केली होती,तेव्हा त्यांनी कोर्टासमोर धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा या त्यांची पहिली पत्नी आहेत,मान्य केलं होतं.तर मग नंतर काय प्रॉब्लेम आला, या प्रश्नावर त्यांना कॅमेऱ्यासमोर रडू कोसळलं.

कारण करुणा शर्मा म्हणाल्या, तो प्रचंड खोटारडा व्यक्ती आहे.शपथपत्रापासून ते प्रत्येक कागदपत्रावर फक्त तुम्हांला एकच गोष्ट दिसेल की, खोटं खोटं आणि खोटं.2009,2014, 2019 मध्ये त्यांनी त्यांच्यावरचे गुन्हेदेखील लपवले आहेत असंही करुणा शर्मा यांनी सांगितले.

तसेच माझं तर सोडा पण त्यांनी शपथपत्रात त्यांच्यावरचे गुन्हे आणि संपत्तीही लपवली आहे.अशा खूप काही गोष्टी आहेत, ज्या त्यांनी शपथपत्रात स्वत:ची बायकोची माहिती लपवली आहे,आमचं लग्न,मुलंबाळं लपवले होते.असे काही लोकं होतं.ज्यांचे आशीर्वाद होते की,आमचं तुटलं.

Karuna Sharma
Pratap Patil Chikhalikar News : आता कुठेही जाणार नाही सांगणार्‍या प्रताप पाटील चिखलीकरांचे राष्ट्रवादीत वजन वाढले; अजितदादांचा विश्वासही कमावला!

माझ्या नवऱ्यानं मला सोडलं नाही. तर त्यांच्या आजूबाजूला जे काही लोक होते,त्यांच्यामुळेच आमचं नातंं तुटलं असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.याचदरम्यान,त्यांनी आज महाराष्ट्रात जितके मंत्री आहेत,आमदार,खासदार, युवा नेते,कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही शिकण्यासारखी गोष्ट असल्याचंही विधान शर्मा यांनी यावेळी केलं. हे सांगतानाच त्यांनी अश्रू अनावर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com