Dhananjay Munde News : परळीत धनंजय मुंडेंचा डबल धमाका; महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य

Parali Assembly Election 2024 : परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे व मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election Result 2024 : परळी विधानसभा मतदारसंघावर सुरवातीपासून मुंडे घराण्याचे वर्चस्व आहे. ते पुन्हा एकदा लाखाच्या वर मताधिक्य मिळवून धनंजय मुंडे यांनी सिध्द केले असून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली आहे.

मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळवत प्रचंड मोठा विजय प्राप्त केला आहे. विजयी होणाच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक काढली आहे.

परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे व मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली. शरद पवार(Sharad Pawar) यांनी परळीत येवून सभा घेत धनंजय मुंडे यांच्या पुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण धनंजय मुंडे यांनी पवारांनी माझी जात काढली पण मी जातीवर, धर्मावर राजकारण करणार नाही तर त्यांनी स्वतः केलेल्या विकासाचा पाढा वाचला. मला अभिमन्यू प्रमाणे अडकावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय नेते करत आहेत पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, अडकणार नाही, असे सांगत प्रचाराची धुरा मुंडे बंधू भगिणींनी उचलली.

Dhananjay Munde
Aurangabad East Assembly Result News : 'काँटे की टक्कर' पण भाजपच्या अतुल सावेंनी एमआयएमचा 'पतंग' कापलाच!

एकाही राज्य किंवा राष्ट्रीय नेत्याची सभा त्यांनी घेतली नाही. पंकजा मुंडे(Pankaja Munde) व धनंजय मुंडे यांनीच संपूर्ण प्रचार केला. यामुळे परळीकरांनी तब्बल १ लाख ४० हजाराचे मताधिक्य मिळवले व राज्यात मताधिक्य मिळवण्यात प्रथम क्रमांक पटकावला, कार्यकर्त्यांनी परळीचा लेक महाराष्ट्रात नंबर एक म्हणत घोषणाबाजी केली.

दरम्यान धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांची सशक्त प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची मोठी फळी, व्यवस्थित नियोजन यामुळे विजय प्राप्त झाला. तर मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख याची प्रचार यंत्रणा कमकुवत होती, कार्यकर्त्यांचा अभाव तर निवडणूक काळात राजेसाहेब देशमुख यांनी परळीत साधे प्रचार कार्यालय सुद्धा सुरू केले नाही. मतदान केंद्रावर कुठेही प्रतिनिधी नव्हते. यामुळे राजेसाहेब देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येत आहे.

Dhananjay Munde
Eknath Shinde : असली शिवसेना अन् राष्ट्रवादी कोणाची याचे उत्तर जनतेने दिले!

उलट धनंजय मुंडेच्या यंत्रणेमध्ये ऐवढा विश्वास होता की आम्ही आमच्या बुथवर जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देवू ते मतमोजणीमध्ये दिसून आले. मताधिक्य देण्याची चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. म्हणून धनंजय मुंडे यांना मोठा विक्रम विजय प्राप्त करता आला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com