Eknath Shinde : असली शिवसेना अन् राष्ट्रवादी कोणाची याचे उत्तर जनतेने दिले!

विधानसभेच्या निकालातून जनतेनेच मविआच्या आरोपांना उत्तर दिल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 result : विकास आणि योजनांची सांगड घालण्यात आम्ही यशस्वी झालो, आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला, त्यामुळे जनतेने महायुतीला भरभरून मते दिली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांनीही यावेळी मतदारांचे आभार मानले.

Eknath Shinde, Ajit Pawar
Maharashtra Assembly Election 2024 Result live Vote Counting : महाराष्ट्राने घराणेशाहीला नाकारलं, विभाजनवादी शक्तींचा पराभव - मोदी

खरी शिवसेना कोणाची या प्रश्नालाही लोकांनीच उत्तर दिले आहे. तसेच राष्ट्रवादी कोणीची आहे, तेही जनतेने ठरवले आहे, हे या निकालातून दिसून येते, असे शिंदे म्हणाले. महायुतीला भरघोस मते देत विधानसभेच्या निकालातून जनतेनेच मविआच्या आरोपांना उत्तर दिल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमची नियत साफ आहे, लोकांना विकास हवा होता, आमच्या सरकारने त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. घरी बसून फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही. पराभूत झाले की ईव्हीएमला दोष दिला जातो. मात्र, लाडक्या बहिनींनी सावत्र भावांना जोडा हाणला आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी उमेदवार यादी जाहीर

राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे, असे शिंदे म्हणाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे सहकार्य, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मेहनत व लाडक्या बहीण-भावांचे आणि जनतेचे प्रेम यांचा हा महाविजय आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 'धर्मयुद्धा'ला मतदारांची साथ; सोयाबीन, कापूस, मराठा आरक्षणाचे मुद्दे निष्प्रभ

बहि‍णींना लाच देता अशी आमच्यावर टीका झाली. मात्र आम्ही त्याचाही सामना केला आणि फक्त कागदावर राहणार नाही, अशी योजना आणली आणि ती यशस्वी करून दाखवली. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, मोदी ताकदीने आमच्या मागे उभे राहिले. विकास आणि योजनांची उत्तम सांगड घातली. सर्व घटकातील लोकांचा हा विजय आहे. केंद्राने दहा लाख कोटींचा निधी दिला. त्यामुळे जनतेने आम्हाला भरघोस मते दिली, असेही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com