Dharashiv BJP District President : धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला

Dharashiv BJP Leadership Contest News : गेल्या काही दिवसापासून भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरु आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : राज्यात वर्षभरातच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरु आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

धाराशिव जिल्हयात दीड लाख सदस्य नोंदणी करत भाजपने (Bjp) आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता बूथ कमिटी व मंडळ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

या निवडीत जुन्या भाजप कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार का नव्याने भाजपमध्ये आलेल्यांना संधी दिली जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी या पूर्वी 26 एप्रिलची मुदत देण्यात आली होती आता ही मुदत 5 मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे समजते.

BJP Flag
BJP News : भाजप शहराध्यक्षपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांची फिल्डिंग; कोण होणार नवा नायक?

धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी सध्या संताजी चालुक्य यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. गेल्या वेळेस जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना कमी कालावधी मिळाला असल्याने त्यांना फारशी काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांचा बहुतांश कालावधी निवडणुकांतच गेला. लोकसभा व विधानसभा निवडणुका त्यांच्या कार्यकाळातच पार पडल्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

BJP Flag
Kolhapur BJP Politics: जुन्याच कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाची संधी! माधुरी मिसाळांनी नव्यांना ठणकावले

चालुक्य यांची ओळख ही कार्यकर्त्याना सहज उपलब्ध होणारा नेता अशीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या या ओळखीचा जिल्हयात भाजप वाढीसाठी मोठा फायदा झाला आहे. त्याशिवाय येत्या काळात म्हणजे 2029 च्या विधानसभा निवडणुकीत उमरगा विधानसभा मतदारसंघ खुला झाला तर भाजपकडून ते प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे चालुक्य जर जिल्हाध्यक्षपदावर कायम राहिले तर त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Flag
Solapur Election Rada News : उमेदवार अंगावर धावले, सोलापुरमधील निवडणुकीत जोरदार राडा

त्याशिवाय धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, नेताजी पाटील, रामदास कोळगे, सतीश दंडनाईक, अनिल काळे, व्यंकट गुंड यांच्या नावाची देखील चर्चा आहे. या निवडीसाठी भाजपकडून निरीक्षक म्हणून आमदार रमेश कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचेच या निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे.

BJP Flag
Solapur Bazar Samiti Result : कल्याणशेट्टी-मानेंना ग्रामपंचायतमध्ये धक्का; मनीष देशमुखांसह तीन जागा देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या

निवडीत यांची भूमिका महत्त्वाची

भाजप जिल्हाध्यक्ष पदाची निवडी करताना तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे दोघेजण कोणाच्या पारड्यात वजन टाकणार त्याचे पारडे या निवडीत जड असणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेच आता या निवड प्रक्रियेत जुन्या भाजप कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार का नव्याने भाजपमध्ये आलेल्यांना संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Flag
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात महत्वपूर्ण घडामोड आली पुढे; डॉक्टरांची म्युच्युअल फंडात 160 कोटींची गुंतवणूक;कोणाला मिळणार परतावा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com