Solapur Bazar Samiti Result : कल्याणशेट्टी-मानेंना ग्रामपंचायतमध्ये धक्का; मनीष देशमुखांसह तीन जागा देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या

Solapur Political News : ग्रामपंचायत गटातून देशमुखांच्या पॅनेलने तीन जागा जिंकल्या असून एक जागा कल्याणशेट्टी-माने पॅनेलला जिंकता आली आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मुलाला निवडून आणण्यात यश आले आहे.
solapur bazar samiti election result
solapur bazar samiti election resultSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलला मोठा धक्का बसूला असून भाजप आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलने तीन जागा जिंकून विजयी सलामी दिली आहे. ग्रामपंचायत गटातून देशमुखांच्या पॅनेलने तीन जागा जिंकल्या असून एक जागा कल्याणशेट्टी-माने पॅनेलला जिंकता आली आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मुलाला निवडून आणण्यात यश आले आहे.

सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे ग्रामपंचायत मतदारसंघातून मनीष देशमुख हे २१६ मतांनी, रामप्पा चिवडशेट्टी हे १९५ मतांनी, तर अतुल गायकवाड हे ७१ मतांनी विजयी झाले आहेत. विरोधी कल्याणशेट्टी-माने-हसापुरे यांच्या पॅनेलला ग्रामपंचायत मतदारसंघात अवघी एका जागेवर समाधान मानावे लागले. कल्याणशेट्टी यांचे समर्थक सुनील शेळके हे ३४ मतांनी निवडून आले आहेत.

सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे मनीष देशमुख यांना 636 मते, रामप्पा चिवडशेट्टी यांनी 615, तर अतुल गायकवाड यांना ५८९ मते पडली आहेत. विरोधी पॅनेलमधील सुनील शेळके यांना ५७० मते पडली आहेत. ते ३४ मतांनी जिंकून आले आहेत. सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे यतीन शहा यांचा शेळके यांनी पराभव केला आहे.

दरम्यान कल्याणशेट्टी माने पॅनेलमधील संगमेश बगले यांना 472 मते, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना 420 मते पडली आहेत.

दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी (ता. 27 एप्रिल) अत्यंत चुरशीने 96.24 टक्के मतदान झाले होते. बाजार समितीच्या 5431 मतदारांपैकी 5227 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

आज सकाळी आठपासून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी सभागृहात मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत मतदारसंघातील मतांची मोजणी करण्यात आली आहे. यानंतर व्यापारी, हमाल तोलार आणि सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com