Ajit Pawar News: भाजपच्या ट्रॅपमध्ये फसलात का? अजितदादांनी दिलं 'हे' सडेतोड उत्तर

Ajit Pawar Join BJP: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या वर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाले. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. कारण त्यांनी खुद्द आपले काका शरद पवार यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला होता.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यानंतर काही दिवसांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याशीच भाजपने (BJP) युती केल्याचा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येतो. शिवाय अजित पवारांवर भाजपने दबाव टाकून त्यांना आपल्याबरोबर येण्यास भाग पाडल्याचंही विरोधक बोलत असतात.

तर अजित पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय म्हणजे ते भाजपच्या ट्रॅपमध्ये फसले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. परंतु आपण कोणाच्याही ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्यावर्षी जुलै महिन्यात सत्तेत सहभागी झाले. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. कारण त्यांनी खुद्द आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला होता. मात्र, अजित पवारांनी हा निर्णय त्यांच्या मनाने घेतलेला नसून ते भाजपच्या खेळीत अडकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. मी कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं काम रोखठोक असतं. असलं लेचंपेचं काम माझं नसतं, राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. परंतु जे काही सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यामध्ये काहीही सत्य नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वत:च्या मर्जीने भाजपमध्ये (BJP) गेल्याचं आता त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar
Rahul Gandhi News : 'नरेंद्र मोदींची सवय आहे की, जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते..'; सोलापूरच्या सभेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

शरद पवार भाजपबरोबर येण्यास 50 टक्के अनुकूल होते

नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवार भाजपबरोबर येण्यास 50 टक्के अनुकूल होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. शिवाय यावर शरद पवारांनीदेखील स्पष्टीकरण दिलं होतं.

Ajit Pawar
Rohit Pawar News : अजितदादांना मोदी-शाहांचा व्हायरस; म्हणून ते पन्नास टक्के खोटे बोलू लागले; रोहित पवारांनी सुनावले!

चर्चा होत असतात परंतु, भाजपसोबत जाण्याचा आमची इच्छा नव्हती आणि कधीही नसणार असं पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे पवारांनी आपण भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला असतानाही अजित पवार मात्र भाजपच्या ट्रॅपमध्ये फसले असं म्हटलं जातं. याच चर्चांना प्रत्युत्तर देत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच विरोधकांकडून केले जाणारे आरोप खोटे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com