
Dilip Mandal about Fatima Pardeshi : दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांच्या संदर्भातील केलेलं विधान अत्यंत खोटं आहे आणि त्यांना केंद्रात मोठी खुर्ची मिळाली म्हणून त्यांनी असं विधान केलं असावं अशी प्रतिक्रिया सत्यशोधक चळवळीच्या नेत्या फातिमा परदेशी यांनी दिली आहे. फातिमा शेख या ऐतिहासिक पात्र नसून मी निर्मित केलेलं काल्पनिक पात्र असल्याचा दावा दिलीप मंडल यांनी एका ट्विट मधून केलं आहे.
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी केलेल्या दाव्याने नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेक नाही, असं मंडल यांनी म्हटलेलं आहे. याचबरोबर फातिमा शेख यांचा अनेक पुस्तकांमध्ये उल्लेक आढळल्याचंही काहींचं मत आहे. त्यांच्यामते हे पात्र इतिहासातीलच आहे. एवढंच नाहीतर फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांना मदतही केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आता या मुद्य्यावरून वाद निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
यावर बोलताना फातिमा परदेशी म्हणाल्या, दिलीप मंडल यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे कारण फातिमा शेख यांच्या बाबत इतिहासातील अनेक पुस्तकांमध्ये अनेक दाखले आजही उपलब्ध आहेत. अशी विधानं करून ते समाजात द्वेष निर्माण करत आहेत.
तसेच, जानेवारी २०२५ मध्ये असं वक्तव्य मंडल करत आहेत कारण त्यांना केंद्रात मोठी खुर्ची मिळाली आहे. पण सत्यशोधक चळवळ त्यांना विनंती करू इच्छिते की कृपया अशी विधानं करू नका, असं ही फातिमा परदेशी म्हणाल्या आहेत.
दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांच्या महात्मा फुले(Mahatma Phule) व सावित्राबाई फुले यांच्या जीवनातील उल्लेखाबाबत मोठा दावा केला आहे. फातिमा शेख हे पात्र मी तयार केलं आहे, त्याबाबत कोणतेही संदर्भ उपलब्ध नाहीत, असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे दिलीप मंडल यांनीच त्यांच्या काही लेखांमध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केलेला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शाळा चालवण्यामध्ये फातिमा शेख यांनी सहकार्य केलं. मात्र आता दिलीप मंडल यांनीच फातिमा शेख हे मी निर्माण केलेलं पात्र आहे असं सांगितलं आहे आणि त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून दिलगिरीही व्यक्त केलेली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.