मुंबई : राज्यात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Assembly Winter Session 2021) सुरूवात होणार आहे. नागपूर ऐवजी मुंबईत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. तसेच २८ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या अधिवेशनात २६ विधेयक चर्चेसाठी मांडण्यात येणार आहेत. यात प्रस्तावित २१ तर प्रलंबित ५ विधेयकांचा समावेश आहे. शक्ती विधेयकांचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ''शक्ती कायद्याच्या संदर्भातील जे विधेयक ज्यॉईंट समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. त्याचं कामकाज पुर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ज्यॉईंट कमिटीचा अहवाल आम्ही सादर करणार आहोत. त्यानंतर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात शक्ती कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल,''
विधीमंडळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावर अनेक प्रश्न विचारण्यात येतील, याबाबत वळसे पाटील म्हणाले की, सभागृहात विरोधकांचं आग्रही म्हणणं आणि त्यावर सरकारची भूमिका ही नेहमीच असते. तसेच ही काही नवीन नाही. मात्र, सामंजस्यांनी सर्व प्रश्न मार्गे लावू,''
या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे. कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.