शिवसेनेचे आमदार बांगर यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदान केंद्रात येऊन, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संतोष बांगर 

आमदार संतोष बांगर 

सरकारनामा

Published on
Updated on

हिंगोली : हिंगोलीमध्ये नगरपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना मतदान केंद्रात कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करणे शिवसेना आमदाराला चांगलेच महागात पडले आहे, कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ShivSena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासह त्यांचा अंगरक्षक पोलिस कर्मचारी व इतर तेरा कार्यकर्त्यांविरुद्ध मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदान केंद्रात येऊन, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंढा शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांनी तक्रार दिल्याने ही कार्यवाही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, आमदार संतोष बांगर हे त्यांच्या अंगरक्षकासह इतर कार्यकर्त्यांना मतदान केंद्रात घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील या तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे.

आमदार बांगर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांनी मतदान केंद्रात विनापरवानगी प्रवेश करत भगव्या रंगाचे रुमाल अंगावर घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्‍न केल्‍याचे देखील म्हटले आहे, पोलिसांना मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिडिओत शिवसेना आमदार संतोष बांगर हे चक्क मतदान केंद्रातील मतदान यंत्र जवळ जाऊन पाहणी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रात छेडछाड केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार जी डी मुळे यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>आमदार संतोष बांगर&nbsp;</p></div>
राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिव बागाईतकर यांचा राजीनामा

मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत बघता शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पार्श्वभूमी ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे अनेक वेळा त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत आणि आता आमदार महोदयांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर सुद्धा या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे देशांमध्ये लोकशाही असताना सत्ताधारी पक्षातील आमदार अशा पद्धतीने नियमाला धाब्यावर बसून मतदान केंद्रावर प्रवेश करतात हे लोकशाहीला घातक आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com