Board exam flying squad : कुंपणानेच शेत खाल्ले? बोर्डाच्या भरारी पथकात 'बडतर्फ' गुरुजींची एन्ट्री; शिक्षण विभागाचा अजब कारभार!

Board exam flying squad controversy news : बोर्ड परीक्षेच्या भरारी पथकात बडतर्फ शिक्षकाची नियुक्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Education department negligence in Maharashtra
Education department negligence in Maharashtra Sarkarnama
Published on
Updated on

Education Department Negligence : राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षांसाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकात एका बडतर्फ शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. संबंधित शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. तरीही त्यांची परीक्षा पथकात निवड झाल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजावर टीका होत आहे.

फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा परिसरातील स्वामी परमानंद गिरी महाराज ज्ञान मंदिर या खासगी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक पंढरीनाथ मुरलीधर शिंदे यांना 6 ऑक्टोबर 2025 रोजी शाळा प्रशासनाने बडतर्फ केले होते. शिस्तभंगाच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती आहे. त्यानंतर ते कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कार्यरत नसल्याचे सांगितले जाते.

Education department negligence in Maharashtra
मोठी बातमी! बहिणींच्या खात्यात 10 हजारांची ओवाळणी! मुख्यमंत्र्यांची 25 लाख महिलांना विशेष भेट; महिला मालामाल!

मात्र, या सर्व पार्श्वभूमीवरही त्यांची थेट दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकात नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 9 फेब्रुवारी रोजी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या आदेशानुसार झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, संबंधित शिक्षकाचे नाव शासकीय विद्यानिकेतनकडून शिफारशीद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणामुळे शिफारस आणि पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखाद्या शिक्षकावर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर त्याची नोंद संबंधित यंत्रणेकडे असणे अपेक्षित असते. तरीदेखील अशा व्यक्तीची महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवड कशी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Education department negligence in Maharashtra
Gram Panchayat News : मोठी बातमी: 20 फेब्रुवारीला राज्यातील ग्रामपंचायती बंद! अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्यव्यापी आंदोलन; काय आहेत प्रमुख मागण्या?

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित बाब आहे. अशा वेळी भरारी पथकात केवळ प्रामाणिक आणि निष्कलंक सेवाअभिलेख असलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती व्हावी, ही मूलभूत अपेक्षा आहे. मात्र, या घटनेमुळे विभागीय यंत्रणेतील समन्वय आणि माहिती पडताळणी प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येते.

दरम्यान, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी संबंधित शिक्षकाचे नाव शासकीय विद्यानिकेतनकडून प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल आणि तथ्य आढळल्यास संबंधितांची नियुक्ती रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच, या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, जबाबदारी निश्चित करून योग्य कारवाई करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com