मोठी बातमी! बहिणींच्या खात्यात 10 हजारांची ओवाळणी! मुख्यमंत्र्यांची 25 लाख महिलांना विशेष भेट; महिला मालामाल!

Government scheme for women : राज्यातील 25 लाख महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. महिलांसाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 25 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत हा विशेष आर्थिक लाभ महिलांना दिला आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजनेत सुमारे 22 लाख ग्रामीण भागातील तर जवळपास 3 लाख शहरी भागातील महिलांचा समावेश आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 10 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले. संबंधित विभागाने यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.

मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत एकूण 25 लाख महिलांच्या खात्यात तब्बल 2500 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास 1.81 कोटी महिलांना रोजगारासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे. राजधानीत आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या हस्ते ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आली. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवरही जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Ladki Bahin Yojana
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मोठा झटका! 30 लाख शेतकरी 22 व्या हप्त्याला मुकणार? पाहा काय आहे कारण, या यादीत तुमचे नाव तर नाही ना?

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचीही उपस्थिती होती. ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी सांगितले की, महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याच्या बाबतीत बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ज्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नव्हती, अशा महिलांनाही आता निधी पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana
Gram Panchayat News : मोठी बातमी: 20 फेब्रुवारीला राज्यातील ग्रामपंचायती बंद! अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्यव्यापी आंदोलन; काय आहेत प्रमुख मागण्या?

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.56 कोटी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात आले आहेत. हा निधी महिलांनी स्वतःचा लघुउद्योग किंवा रोजगार सुरू करण्यासाठी वापरावा, असा उद्देश आहे. शहरी भागातील 12 लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. नगरपालिकांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात असून पुढील 15 दिवसांत ती पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com