Diwali Bonus : 'BMC'च्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस! आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, 'दिवाळी धमाका'!

BMC Worker Diwali Bonus : या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Srakarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खास गोड ठरणार आहे. महापालिका प्रशासनाने यंदाही आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून विविध कर्मचारी संघटना वाढीव सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी प्रयत्न करत होत्या. अखेर गुरुवारी महानगरपालिकेने ही मागणी मान्य करत वाढीव अनुदानाची घोषणा केली. महापालिका अधिकारी, कर्मचारी, तसेच अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना हे अनुदान लागू होणार आहे.

Mumbai Municipal Corporation
Pension Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन'! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल, कोट्यवधी कुटूंबियांची दिवाळी झाली गोड!

महापालिकेच्या निर्णयानुसार, सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये सानुग्रह अनुदान, तर सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज निमित्त 14 हजार रुपये, आणि बालवाडी शिक्षिका तसेच मदतनीसांना 5 हजार रुपयांची भेटरक्कम देण्यात येणार आहे. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचाही आनंद द्विगुणित झाला आहे.

महानगरपालिकेच्या विविध खात्यांतील कर्मचारी मागील काही दिवसांपासून या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते. मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी अनुदानाची रक्कम वाढल्याने कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. "महापालिकेने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कर्मचाऱ्यांचा सण आनंदमय करण्याचा निर्णय घेतला आहे," असे काही संघटनांनी नमूद केले.

Mumbai Municipal Corporation
Indian Notes Material : भारतीय नोट कागदापासून नाही, तर 'या' मौल्यवान गोष्टींपासून होते तयार

महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि शिक्षकांना सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी, घरगुती खर्चासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरणार आहे. कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाचं स्वागत करत “ही दिवाळी खास बनवणारा निर्णय” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com