Bhai Jagtap News : अदानीचे नाव आले की केंद्र, राज्य सरकार नतमस्तक का होते ?

Mumbai : या नव्या बदलामुळे धारावीतील माणूस मुंबई बाहेर म्हणजे नवी मुंबईत फेकला जाणार आहे.
 Bhai Jagtap News
Bhai Jagtap NewsSarkarnama

Monsoon Session : अदानीचे नाव आले की राज्य आणि केंद्रातील सरकार नतमस्तक का होते? त्यांचे तळेवे का चाटते ? अशा शब्दात काॅंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सभागृहात टीका केली. (Bhai Jagtap News) २८९ च्या प्रस्तावात जगताप यांनी धारावी प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला कमी किंमतीत दिल्याचा मुद्दा उपस्थीत केला. देशातील बंदरे, विमानतळे अदानींच्या घशात सरकारने आधीच घातले आहेत. आता गरिबांची धारावी पण घालणार का? असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला.

 Bhai Jagtap News
Tanaji Sawant News : कारवाईची मागणी होताच आरोग्यमंत्र्यांनी केले शल्यचिकित्सकांचे निलंबन..

पाच वर्षापुर्वीचा म्हणजे २०१८ ला धारावी प्रकल्प ७ हजार २०० कोटीला एका कंपनीला देण्यात आला होता. (Congress) आता तोच प्रकल्प अदानीला ५ हजार ६९ कोटीला देण्यात आला आहे. धारावीत शेकडो छोटे उद्योग, लाखो नोकऱ्या आहेत. (Mumbai) रेल्वेची जागाही मोठ्या प्रमाणात आहे, ती देखील त्यांना बहाल करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आधीच्या कंत्राटामध्ये या जागेचा समावेश नव्हता. शिवाय रेल्वेच्या जागेसाठी म्हाडाने ८०० कोटी भरलेले असतांनी ही जागा देखील अदानींच्या घशात घालण्याचा घाट घातला गेला आहे. (Bhai Jagtap) धारावीतील लाखो लोकांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. एअरपोर्टजवळ हा धारावीचा भाग येतो. जिथे ३ ते ५ चा एफएसआय आहे तिथे नियम डावलून अदानी ग्रुपला ८ ते १० चा एफएसआय देण्यात आल्याचा दावा देखील जगताप यांनी केला.

यातून मिळणाऱ्या ५० टक्के टीडीआरमधून अरबो, खरबोंचा घोटाळा होणार आहे. मुंबईतील बिल्डरांना तो खरेदी करावा लागणार आहे. गरीब आणि सरकारी जागेचा व्यापार या माध्यमांतून मांडण्यात येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला. गरीबांची धारावी त्यांच्या घशात घालण्याचे पाप सरकार करत आहे.

स्थलांतरितांना ८ ते १० किलोमीटरमध्ये घरं दिली जाणार आहे, पण प्रत्यक्षात नियम ५ किलोमीटरचा आहे. या नव्या बदलामुळे धारावीतील माणूस मुंबई बाहेर म्हणजे नवी मुंबईत फेकला जाणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या विषयावर एक तासाची चर्चा द्या, अशी मागणी देखील जगताप यांनी केली. मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांनी सूचना अमान्य केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com