Tanaji Sawant News : कारवाईची मागणी होताच आरोग्यमंत्र्यांनी केले शल्यचिकित्सकांचे निलंबन..

Parbhani : नागरगोजे यांनी कोरोना काळात नियम पायदळी तुडवत खरेदी प्रक्रिया राबवत भ्रष्टाचार केल्याचा आरोप.
Health Minister Tanaji Sawant News
Health Minister Tanaji Sawant News Sarkarnama
Published on
Updated on

Monsoon Session : परभणीचे तत्कालीन शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांच्यावर कोरोना काळात गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी अद्यापही त्यांच्यावर कारवाई न केल्याचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या काळात उपस्थितीत केला. (Tanaji Sawant News) यावर आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सांवत यांनी नागरगोजे यांना निलंबित करत असल्याची घोषणा सभागृहात केली.

Health Minister Tanaji Sawant News
Tanaji Sawant News : पालकमंत्री शिवसेनेचे, निधीची उधळण भाजपवर ; स्थगिती देत मुख्यमंत्र्यांचा झटका..

परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे यांनी कोरोना काळात नियम पायदळी तुडवत खरेदी प्रक्रिया राबवत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. (Tanaji Sawant) त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे सांगत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करणार का? सध्या ते कुठे कार्यरत आहेत? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थितीत केला.

यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले बाळासाहेब नागरगोजे यांच्यावर वित्तीय अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. (Parbhani) कोरोना काळात ते कार्यरत होते, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. (Marathwada) या चौकशीतील प्राथमिक अहवालानूसार वित्तीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते. पंरतु नागरगोजे यांनी चौकशी समितीला सहकार्य केले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण केले, तेव्हा त्यांच्या अहवालात देखील कोरोना काळात खरेदी केलेल्या साहित्याची नोंदवही आणि नोंदच नसल्याचे समोर आले. मिळालेला पैसा इतर बाबींवर खर्च केला गेला, तसेच खरेदी प्रक्रियेचे नियम पाळले गेले नाही. आॅक्सीजन वाहतूकीसाठीच्या आरटीओने ठरवून दिलेल्या दरपत्रकाचे उल्लंघन करण्यात आल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. ४ कोटी पैकी ५१ लाखांची देयके सादर करण्यात आलेली नाहीत.

या शिवाय चौकशी समितीला आवश्यक असलेली इतर माहित देखील उपलब्ध करून दिली नाही. प्रथमदर्शनी १ कोटी ४३ लाखांची रिकव्हरी त्यांच्याकडे निघते, अशी माहिती सावंत यांनी दिली. तसेच बाळासाहेब नागरगोजे यांना निलंबित करत असल्याची घोषणा देखील केली. तसेच तीन महिन्यात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com