Pandharpur News : राजस्थान सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारही राज्यातील सर्व खासगी शाळा स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या विचाराधीन असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे..यानंतर खासगी संस्थाचालकांची धाकधूक वाढल्याचं समोर आलं होतं. याचदरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) हे सोमवारी (दि.१०) पंढरपुर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा राज्य सरकार ताब्यात घेणार यावर भाष्य करताना केसकर म्हणाले, सध्यातरी असा कोणताही विचार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. परंतू कोणी संस्थाचालक पुढे आले तर त्यांचाही सरकार विचार करेल असे ते म्हणाले.
तसेच लवकरच राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार असल्याचेही असल्याची माहितीही शिक्षणमंत्री केसरकर यांनी यावेळी दिली.
यामुळे सध्यातरी सरकारकडून खासगी शाळा ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे राज्यातील खासगी शिक्षण संस्था चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केसरकरांनी नेमका काय दिला होता इशारा..?
राजस्थान सरकारने सर्व शाळा स्वतःच्या ताब्यात घेतल्या असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही धोरणात्मक निर्णय घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी खासगी शिक्षण संस्थाचालकांना दिला होता.
केसरकर म्हणाले, संस्थाचालकांना जमत नसेल तर शाळा सरकारच्या ताब्यात द्याव्यात, आम्ही सर्व व्यवस्था करू. तुम्ही मुलांसाठी शाळा बांधल्या असतील एक रुपयाही न घेता विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे वेतन, अनुदान, देखभालीच्या बोलीवर शाळा सरकारकडे सोपवा असे आवाहन केसरकर यांनी संस्थाचालकांना दिले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.