Khed Panchayat Samiti : आढळरावांनी अखेर करून दाखवलं : खेड पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन

आढळराव यांनी अखेरपर्यंत पंचायत समितीच्या इमारतीसाठी आग्रह धरला आणि त्या कामाला आज सुरुवातही केली.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड तालुक्याच्या राजकारणातील एक वर्तुळ आज पूर्ण झाले. खेड तालुका पंचायत समितीच्या बहुचर्चित नवीन इमारतीच्या कामास अखेर सुरुवात झाली असून शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले. आढळराव यांनी अखेरपर्यंत पंचायत समितीच्या इमारतीसाठी आग्रह धरला आणि त्या कामाला आज सुरुवातही केली. (Bhoomipujan of the Khed panchayat samiti building)

गेली चार वर्षे तालुक्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यावर आज (ता.२६ मार्च) भूमिपूजन करण्यात आले. स्वर्गीय सुरेश गोरे आमदार असताना त्यांनी पंचायत समितीसाठी नवीन इमारत मंजूर करून घेतली होती. तेव्हा ५ कोटी अंदाजपत्रकीय रक्कम असलेल्या या इमारतीचे १४ सप्टेंबर २०१९ रोजी आढळराव पाटील व (स्व.) गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.

Shivajirao Adhalrao Patil
Chitra Wagh News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागला, याचे दुःख आहेच : चित्रा वाघांनी दिली कबुली

विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि दिलीप मोहिते आमदार झाले. त्यांनी हे काम थांबविले आणि या जागेवर प्रशासकीय इमारत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात शिवसेनेने आंदोलने केली. सुरेश गोरेंचे स्वप्न असलेली इमारत त्याठिकाणीच व्हावी, असा त्यांचा आग्रह होता.

दरम्यान, पंचायत समितीचे शिवसेनेचे आठपैकी पाच सदस्य फोडत मोहिते यांनी पंचायत समितीवर वर्चस्व मिळविले. त्या घडामोडीत आरोप प्रत्यारोप झाले. हाणामाऱ्या झाल्या. तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांना तुरुंगवास झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तीव्र संघर्ष झाला. तो राज्यपातळीवर तत्कालीन मंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत पोहोचला. खासदार संजय राऊतांनासुद्धा खेडला यावे लागले.

Shivajirao Adhalrao Patil
Pune News : पुण्यात ’डमी आमदारां’चे पेव : ‘विधानसभा सदस्य’ स्टिकर लावून गुंडच फिरतात; आमदारानेच व्यक्त केली खंत

आमदार मोहिते यांनी या जागेचे जिल्हा परिषदेकडून महसूल खात्याकडे हस्तांतरण करून घेतले आणि त्याठिकाणी २१ कोटी अंदाजपत्रकीय रक्कमेची प्रशासकीय इमारत मंजूर करून घेतली. त्यासंदर्भात काही प्रक्रिया सुरू असतानाच महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेना फुटली. काही दिवसांनी आढळराव पाटील, भगवान पोखरकर वगैरे मंडळी शिंदे गटात गेली. पोखरकर जिल्हाध्यक्ष झाले.

शिंदे गटाने प्रयत्न करून या जागेवरील प्रशासकीय इमारतीची मंजुरी रद्द केली. ही जागा पुन्हा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत केली. पुन्हा मोहिते व आढळराव यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. आढळरावांच्या पुढाकाराने नवीन पंचायत समितीच्या इमारतीचे पुन्हा अंदाजपत्रक केले गेले. ते १४ कोटींचे झाले. त्याला मुख्यमंत्री शिंदेंकडून मंजुरी मिळविली. यथावकाश या कामाची निविदा निघाली. ती मंजूर झाली आणि कार्यादेशही देण्यात आला.

Shivajirao Adhalrao Patil
Shinde Group News : मालेगावमधील सभेआधीच शिंदे गटाचा ठाकरेंना दणका : नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुन्हा चार वर्षांनी आज आढळरावांनी तिचे भूमिपूजन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पोखरकर, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, नितीन गोरे, अरूण गिरे, ज्योती अरगडे, प्रकाश वाडेकर, मारुती सातकर, महेश शेवकरी, बिपीन रासकर, विजय हुरसाळे, दत्ता कंद, धनंजय पठारे, नयना झनकर आदी उपस्थित होते. भूमिपूजन झाल्यावर फटाके फोडण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com