Ambadas Danve News : तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी बोर्डासाठी प्रयत्न करणार..

Mumbai News : तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांना योग्य वागणूक मिळावी.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : राज्यात तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली, मात्र अद्याप ते महामंडळ अस्तित्वात आले नाही. (Mumbai News) हे महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे या मागणीसाठी पुढाकार घेऊन सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

Ambadas Danve News
Ashok Chavan News: `चंद्रयान -३`, हा तर नेहरूंच्या अभ्यासपूर्ण विचारांचा यशस्वी परिणाम..

तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी महामंडळ लवकरात लवकर स्थापित करावे, या मागणीसाठी आज काही तृतीयपंथींनी दानवे यांची त्यांच्या विधानभवनातील दालनात भेट घेतली. (Shivsena) या भेटीत त्यांचे प्रश्न, समस्या याबाबत दानवे यांनी समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवून आणली.

यावेळी (Maharashtra) समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर अध्यक्ष व सारथी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. डॉ.पवन यादव, गुरू शोभा नायकजी, एम. निषाद,सना, वासवी त्रिवेणी समाज,अमृता, रेणुका, शिल्पा, संगीता चटलानी आदी उपस्थित होते. (Mumbai) राज्यात तृतीयपंथीयांच्या अनेक समस्या आहेत.

समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तृतीयपंथीयांचे जीवनमान सुधारावे यासाठी अनेक प्रयत्न होत असले तरी ते पुरेसे नाही. राज्य शासनाने या वर्गासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु याबाबत अद्यापही ठोस निर्णय सरकारने घेतलेला नाही.

तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांना योग्य वागणूक मिळावी यासाठी हे कल्याणकारी मंडळ लवकर स्थापन होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तृतीयपंथीयांच्या कल्याणकारी मडळासाठी आग्रह धरू, असे आश्वासन दानवे यांनी यावेळी दिले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com