

Eknath Shinde News: येवला हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. तो विकासाचा पॅटर्न म्हणून चर्चेत असतो. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येवल्यात सभा घेतली. शिंदे यांनी भुजबळ यांचे नाव न घेता विकासाच्या मुद्यावर त्यांना चॅलेंज केले.
'येवल्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करायचा आहे. येथील नागरिकांनी विकासाची किती वाट पाहायची?', असा प्रश्न शिंदे यांनी भुजबळ यांचे नाव न घेता केला.
येवला नगर परिषदेसाठी आमदार किशोर दराडे आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या पॅनलचा प्रचार त्यांनी केला. येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी दराडे यांच्या पॅनलला विजयी करावे. आगामी पाच वर्ष या गावाला निधी आणि विकासाची चिंता करावी लागणार नाही, असे शिंदे म्हणाले.
येवला शहरात अनेक प्रश्न आहेत. येवल्यातील गाळेधारकांचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवणार आहे. येथे उद्योग नाही. रोजगार नाही. गेली बारा वर्ष त्याची प्रतीक्षा आहे. आता युवकांनी आणखी 14 वर्ष वाट पाहायची का? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना आणि महिलांसाठी केलेल्या कामांची यादीच पुन्हा एकदा सांगितली. मी सामान्यांसाठी काम करणारा माणूस आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मी सीएम म्हणजे कॉमन मॅन असे स्वतःला मानत होतो. सामान्यांची दुःख अडचणी याची मला चांगली जाणीव आहे. त्यामुळे सत्तेचा वापर याच दृष्टिकोनातून करीत आलो आहे.
शिंदेंच्या सभेला मोठी गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माणिकराव शिंदे यांनीही सभेला हजेरी लावली. दराडे यांच्या पॅनलमध्ये शिंदे यांचा समावेश आहे. हा देखील चर्चेचा विषय ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.