Eknath Shinde : अजितदादांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक, म्हणाले 'माझा मोठा भाऊ गेला...'

Ajit Pawar Death Eknath Shinde : अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.
Ajit Pawar Death Eknath Shinde
Ajit Pawar Death Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली.

बारामतीजवळ विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. अजित पवार पहाटेपासून कामाला लागायचे. सकाळी सहा वाजताही त्यांनी आदेश दिल्याचे मी स्वतः पाहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते बोलायचे. रोखठोक स्वभाव असला, तरी मनाने ते अत्यंत निर्मळ होते,” असं शिंदे यांनी सांगितलं.

Ajit Pawar Death Eknath Shinde
Ajit Pawar Death: बारामती पोरकी झाली! अनेक जण धाय मोकलून रडत होते...दादा आपल्यात नाहीत ही भावनाच अस्वस्थ करणारी...

मंत्रिमंडळात जेव्हा राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा व्हायची, तेव्हा अजित पवार नेहमीच वास्तव मांडायचे आणि योग्य दिशा सुचवायचे. “त्यांचा अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावरील पकड आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरायची,” असंही त्यांनी नमूद केलं.

काल-परवाच एका कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याची आठवण सांगताना शिंदे भावूक झाले. आज त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक निर्भीड, धडाडीचा आणि अनुभवी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याची आठवण कायम जनतेच्या मनात राहील.

Ajit Pawar Death Eknath Shinde
Ajit Pawar Passed Away : 'दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला...', अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com