Dhangar reservation : मोठी बातमी! धनगर आरक्षणासाठी सरकार जीआर काढणार, 'त्या' शब्दातील संभ्रम दूर होणार?

Eknath Shinde Dhangar Reservation : धनगड आणि धनगर एकच आहेत त्याविषयी स्वतंत्र जीआर काढण्याच्या मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार सरकार समितीची स्थापना करणार आहे.
Dhangar Reservation
Dhangar ReservationSarkarnama
Published on
Updated on

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. धनगर आरक्षणासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे. इतर राज्यातील धनगड आणि धनगर एकच आहे, याचा अभ्यास ही समिती अभ्यास करेल. त्यानंतर सरकार जीआर काढेल, असे आश्वासन धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला देण्यात आले आहे.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पाडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

धनगड आणि धनगर एकच आहे, याचा अभ्यास करण्यात येत असून कर्नाटक आणि गोवा ही दोन राज्य बाकी असून त्यासाठी IAS अधिकारी शिंदे यांच्या समितीला 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. ज्या आदिवासींच्या योजना आणि सवलती धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर त्या विभागाचे निधीचे पुर्ननियोजन करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

सरकार जीआर काढणार?

धनगड आणि धनगर एकच आहेत त्याविषयी स्वतंत्र जीआर काढण्याच्या मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे तीन वरिष्ठ अधिकारी आणि सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील पाच सदस्यांची समितीची स्थापना करण्यात येईल. जीआरचा मसूदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे. त्यासाठी ही समिती पुढील चार पाच दिवसात बैठक घेईल त्याप्रमाणे ड्राफ्ट तयार करेल. अॅडव्होकेट जनरल यांचे यावर मत घेतले जाईल, असे देखील शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पंढरपूरमध्ये उपोषण

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरात राज्यव्यापी बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस होता. उपोषणकर्त्या सहा पैकी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान, पंढरपुरात उपोषणकर्ते आहेत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती राज्यसरकारडून करणार आहोत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Dhangar Reservation
Teacher marches : शिक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक; राज्यभर मोर्चे काढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com