Shiv Sena vs Kunal Kamra : 'टीका हा लोकशाहीचा आत्मा, हे मोदींचे म्हणणे शिंदेंना मान्य नाही का?' काँग्रेसच्या सपकाळांनी महायुतीला दाखवला आरसा

Congress Harshawardhan Sapkal Mahayuti government Eknath Shinde Shiv Sena comedian Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका.
Congress Harshawardhan Sapkal 1
Congress Harshawardhan Sapkal 1Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics latest news : विडंबन असो वा थेट परखड शब्दांत असो, जवळपास सर्वच क्षेत्रात टीकाटिप्पणी होत असते. सद्यस्थितीत मात्र कोणत्याही स्वरूपात टीका केल्यास त्यावर अवलोकन करणे दूरच राहिले, उलट टीकाकारांना धारेवर धरले जात असल्याचे दिसते.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याच विषयावर भाष्य केले आहे. आरसा दाखवल्याने सपकाळ यांची ही टीका महायुतीला झोंबणार असेच दिसते.

नुकतेच एका अमेरिकन संशोधकाच्या पॉडकास्टकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सविस्तर मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र मोदी समर्थक महायुतीच्या नेत्यांना हे मान्य नाही का? असा प्रश्न पडतो. हाच धागा पकडून महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलेच सुनावले.

Congress Harshawardhan Sapkal 1
Central Government Food Security Scheme : कर्नाटकमधील तीन खासदारांमध्ये रंगला वाद; उपराष्ट्रपती धनखड म्हणाले...

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विडंबनपर गाण्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक भडकले आणि स्टुडिओची तोडफोड केली. तत्पूर्वी शासक म्हणून औरंगजेब व फडणवीस यांची तुलना केली म्हणून नाराजीचा सूर उमटला. औरंगजेबाशी तुलना करताना वैयक्तिक नव्हे तर शासनपद्धतीचा संदर्भ होता, तरी देखील अर्थाचा अनर्थ करत वाद निर्माण केला गेला.

Congress Harshawardhan Sapkal 1
MVA Alliance Dispute : ‘लोकलेखा’ समितीवरून नाराजी; महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा चव्हाट्यावर!

थोडक्यात, मोदी म्हणाले तसे टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे तर महाराष्ट्रातील महायुतींच्या नेत्यांनी हीच भूमिका स्वीकारणे अपेक्षित होते. परंतु त्यांची भूमिका पूर्णपणे विसंगत दिसते, असे सपकाळ म्हणाले. कामरा यांच्या विडंबनपर गाण्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले. स्टुडिओची तोडफोड, गुन्हा दाखल करणे यावरच शिंदे समर्थक थांबले नाहीत तर विधानसभेत देखील सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. ही कृती टीका स्वीकारण्याचे लक्षण कदापि नाही.

विशेष म्हणजे सरकारी यंत्रणांचा वापर करून तोडफोडीला अधिकृत स्वरूप दिले जात असल्याचे असते. स्टुडिओची मूळ जागा एका स्वातंत्र्यसैनिकाची होती. त्याच ठिकाणी मागील आठवड्यात भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कार झाला होता. परंतु कुणाल कामरा यांनी स्टँड अप केल्यानंतर ही जागा बेकायदेशीर ठरवून स्टुडिओचे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचे पथक तिथे धडकले. अर्थात सत्तेचा लंबक बिघडला आहे. एकूणच साऱ्या व्यवस्था बिघडल्या आहेत, असे ठाम मत सपकाळ यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com