राज्यात १ एप्रिलपासून धूमशान; 'सहकारी' संस्थांच्या निवडणुका जाहीर

Election | Maharashtra : कोरोनामुळे रखडलेल्या सर्व सरकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील दोन वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र या सहकारी संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी आज पारित केला आहे. १ एप्रिलपासून राज्यात या निवडणुकांचा धूरळा उडणार असून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांना आता तयारीनिशी उतरावे लागणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात याव्यात. ही प्रक्रिया १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत पूर्ण करण्यात यावी. या निवडणूक प्रक्रिया सुरू न करणे याबाबत न्यायालय किंवा इतर सक्षम अधिकार्‍याचे विशिष्ट संस्थेबाबत आदेश असल्यास अशा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये असे देखील या आदेशात नमूद केले आहे.

Local Body Elections
`जरंडेश्वर`बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय : कारखाना शेतकऱ्यांकडे देण्याची सोमय्यांची मागणी

त्यामुळे या निवडणुकीसाठी १ एप्रिल ही अर्हता गृहीत धरून पात्र असलेल्यांची प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच ज्या क्रमाने संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्याच अनुक्रमाने या सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी असे सांगण्यात आले. जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, टप्प्यातील संस्था १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत निवडणुकीसाठी पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रिया तात्काळ प्रभावाने पूर्ण कराव्यात.

Local Body Elections
गुडन्यूज! वर्षाला ३ LPG सिलेंडर मिळणार मोफत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुकी करिता प्रारुप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा सहकारी संस्था व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 अंतर्गत कारवाई करावी. असेही या आदेशात म्हटले आहे. या नव्या आदेशामुळे जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थेचे संचालक होण्यासाठी गेले काही महिन्यापासून धडपड सुरू असलेल्यांना आता आखाड्यात उतरून आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com