SIR Update : फॉर्म 6 मध्ये निवडणूक आयोगाचा मोठा फेरबदल; मतदारांवर कसा होणार परिणाम?

New rules for voter registration in India : निवडणूक आयोगाने फॉर्म 6 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन मतदार नोंदणीचे नियम काय आहेत? या बदलांचा मतदारांवर कसा परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर.
New changes in Election Commission Form 6
New changes in Election Commission Form 6Sarkarnama
Published on: 
Updated on: 

देशभरात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) राजकीय वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. ऑनलाइन Form 6 मधून SIR संबंधित घोषणापत्र हटवण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदार म्हणून नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज करताना अतिरिक्त माहिती देण्याची आवश्यकता राहणार नाही. या निर्णयामुळे नवीन मतदारांची नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी होण्याची शक्यता आहे.

नेमका काय बदल करण्यात आला?

यापूर्वी नवीन मतदारांना Form 6 भरताना SIR प्रक्रियेशी संबंधित काही अतिरिक्त माहिती द्यावी लागत होती. विशेषतः अर्जदाराच्या वडिलांचे, आजोबांचे किंवा पूर्वजांचे नाव जुन्या मतदार यादीत होते का, यासंदर्भात माहिती मागवली जात होती. यासाठी अर्जामध्ये 3 पर्याय देण्यात आले होते.

मात्र, जुन्या मतदार यादीतील पूर्वजांची माहिती उपलब्ध नसलेल्या नागरिकांना ही अट पूर्ण करताना अडचणी येत असल्याची चर्चा होती. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी आणि SIR प्रक्रिया यांची सांगड घातल्याने अर्जदारांवरील अतिरिक्त कागदपत्रांचा आणि माहितीचा भार वाढत असल्याची टीका होत होती.

New changes in Election Commission Form 6
Woman grabs DM collar : धक्कादायक घटना : संतापलेल्या महिलेने हातात चप्पल घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांची कॉलर पकडली

आता निवडणूक आयोगाने ऑनलाइन Form 6 मधील हे SIR संबंधित घोषणापत्र हटवले आहे. त्यामुळे ECINet पोर्टलवरून नवीन मतदार म्हणून अर्ज करणाऱ्या नागरिकांना स्वतंत्रपणे SIR संदर्भातील ही माहिती देण्याची अट राहिलेली नाही.