Dhananjay Mahadik News : लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान; धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका

Political News : कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने महाडिक यांना नोटीस बजवाली आहे.
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाषणातून लाडक्या बहि‍णींना दमदाटी करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. महाडिक यांनी लाडक्या बहिण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या प्रचारात जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, आपण त्यांचे पैसे बंद करू, असा धमकी वजा इशारा दिला होता. त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने महाडिक यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सात दिवसाच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत विरोधी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. (Dhananjay Mahadik News)

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे (BJP) उमेदवार अमल महाडिक हे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू आहेत. प्रचारार्थ त्यांनी फुलेवाडी येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेप्रसंगी बोलत असताना धनंजय महाडिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी या सभेत काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत जी बहीण दिसेल, त्यांचे फोटो काढा. त्यांचे फोटो आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, अशा शब्दांत लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरल्याने विरोधकांंसह सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Dhananjay Mahadik
Uddhav Thackeray : वर्षा बंगला सोडू नका म्हणणारा दुसऱ्या दिवशीच गेला तिकडे नाचायला; साथ सोडून गेलेल्या आमदारावर ठाकरेंची टीका

दरम्यान, 'काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत जी बहीण दिसेल, त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो.' असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विशेषता काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Dhananjay Mahadik
Ajit Pawar : गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही अन् निघाले राज्याचे नेतृत्व करायला; अजित पवार-जयंत पाटलांमध्ये वार- पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com