Uddhav Thackeray : वर्षा बंगला सोडू नका म्हणणारा दुसऱ्या दिवशीच गेला तिकडे नाचायला; साथ सोडून गेलेल्या आमदारावर ठाकरेंची टीका

Politcal News : मराठवाड्यतील कळमनुरीमध्ये झालेल्या प्रचार सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. सध्या प्रचार शिगेला पोहचला असून सत्ताधारी व विरोधकांकडून एकेमकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच मराठवाड्यतील कळमनुरीमध्ये झालेल्या प्रचार सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर मी वर्षा निवासस्थान सोडले, त्यावेळी हा गद्दार सांगत होता. साहेब, मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच लाच घेतली अन गेला तिकडे नाचायला, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या कारभाराची सर्वांसमोरच वाभाडे काढली.

मी हिंगोलीत गुंडगिरीवर नांगर फिरवायला आलो आहे. नवीन पीक घेण्याआधी नांगरटी करावी लागते. गेल्या निवडणुकीत मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. ज्या-ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आपल्या विरोधात गद्दारच उभे आहेत. या निवडणुकीत गद्दारांना पाडण्याची मोठी संधी चालून आली आहे, त्यामुळे त्यांना पराभूत करा असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.

विषय गद्दाराचा नाही. या निवडणुकीत तुम्हाला गद्दारालाच पाडायचे आहे, शिवसेना (Shivsena) फुटण्यापूर्वी तुमच्या येथील गद्दार बराच वेळ माझ्याकडे येत होता. साहेब मला वाचवा, मला तेव्हा वाटले नाही हा एवढा नाटकी आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आपलं नाव चोरलं निशाणी चोरली, चूक माझीच होती नको त्यांना उमेदवारी दिली, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. कितीही नाटकं केली पैसा ओतला तरी समोरचे विकणार नाहीत. गद्दार विकला जातो निष्ठावान विकला जात नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com