Election Commission News : ‘शिक्षक-पदवीधर’ निवडणुकीला 'उन्हाळी सुट्टी' आडवी; आयोगाचा मोठा निर्णय…

Teachers Constituency : निवडणूक आयोगाने सहा दिवसांपुर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 10 जूनला मतदान होणार होते.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission News) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आज याबाबतची घोषणा केली आहे. मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आयोगाने सहा दिवसांपुर्वीच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या.  

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) चार मतदारसंघासाठी आठ मेला निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार इच्छूकांना 22 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होता. तर 10 जूनला मतदान होते. (Graduates and Teachers Constituencies) त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी जुळवाजुळवही सुरू करण्यात आली होती. (Latest Political News)

Election Commission
Neera Canal Water Issue : माढ्याचे मतदान संपताच नीरा कालव्याचे पाणी बंद; मोहिते पाटलांचा निंबाळकरांवर हल्लाबोल

आयोगाने मंगळवारी अचानक या निवडणुका पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले आहे. (Maharashtra Legislative Council) शाळांच्या उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर या निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये निवडणूक घेतल्यास मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शिक्षक संघटनांची भूमिका होती. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुका पुन्हा कधी होणार, याबाबत आयोगाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांत सुधारित तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. तोपर्यंत राजकीय पक्षांनाही उमेदवार ठरवण्यासाठी वेळ मिळणार आहे.

असा होता निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धी - 15 मे

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत - 22 मे

नामनिर्देशनपत्रांची छाननी - 24 मे

नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत - 27 मे

मतदानाचा दिनांक - 10 जून

मतदानाची वेळ - सकाळी 8 ते दुपारी 4

मतमोजणीचा दिनांक - 13 जून

एकूण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक - 18 जून

Election Commission
Danve Vs Kale: जालन्यात हवा काळेंची, पण बाजी दाजींची ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com