Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी 10 जूनला मतदान होणार आहे. त्यामध्ये मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या चार जागांच्या निवडणुकीची घोषणा बुधवारी दुपारी केली आहे.
मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघात होत असलेल्या या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार या बाबत उत्सुकता कायम आहे. या जागांसाठी भाजप (Bjp), शिवसेना ठाकरे गट (Shivsena) व काँग्रेसने (Congress) तयारी केली आहे. त्यामुळे कॊणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhanparishad Election News )
राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी १५ मे रोजी आधिसूचना लागू होणार आहे तर या निवडणुकीसाठी १५ ते २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २४ मे रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहेत तर २७ मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी १० जूनला मतदान होणार आहे तर १३ जूनला मतदान होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १८ जून पूर्वी पार पडणार आहे, अशी माहिती बुधवारी निवडणूक आयोगाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राज्यातील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे.दरम्यान, राज्यातील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून जोरात प्रचार सुरु आहे. प्रचार शिगेला पोचल्याने सत्ताधारी व विरोधकांकडून एकही आरोपाची संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच आता विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने महिनाभरातच मुंबई व कोकण विभागातील नागरिकांना महिनाभरातच दुसऱ्या निवडणुकीसाठी मतदान करावे लागणार आहे.